Vivo T3 5G : पहिल्याच सेलमध्ये ‘या’ फोनवर 2 हजारांची सवलत! कुठे मिळतेय संधी? जाणून घ्या…

Vivo T3 5G : आता तुम्ही Vivo T3 5G हा फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. कंपनीच्या या फोनवर शानदार सवलत उपलब्ध करून दिली आहे. अशी शानदार सवलत कुठे मिळत आहे? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

तुम्ही आता Vivo T3 5G स्मार्टफोन फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकता. इतकेच नाही तर हा फोन आज 27 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB स्टोरेज दिले आहे.

मिळेल विशेष सवलत

किमतीचा विचार केला तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटसाठी नवीनतम Vivo फोनची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. इतकेच नाही तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह व्हेरिएंट 21,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला आहे. तसेच एचडीएफसी बँक किंवा एसबीआय बँक कार्डद्वारे पेमेंट केले तर 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे आणि 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत फोन तुमचा असेल.

Vivo स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे आणि तो 120Hz रिफ्रेश दर देतो. मजबूत कामगिरीसाठी, Vivo T3 5G मध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर प्रदान केला आहे. या फोनमध्ये Android 14 वर आधारित FuntouchOS 14 सॉफ्टवेअर स्किन दिली आहे. कंपनीच्या या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील देण्यात आला आहे.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीच्या या फोनच्या मागील पॅनलवर 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP दुय्यम सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16MP सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. या फोनमध्ये 44W फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. कॉस्मिक ब्लू आणि क्रिस्टल फ्लेक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये फोन खरेदी करता येईल.

Leave a Comment