Vitamin B12 । व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे होतो मृत्यू? वेळीच जाणून घ्या नाहीतर…

Vitamin B12 । जर तुम्ही व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावध व्हा. असे करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. अनेकजण ही कमतरता भरून काढण्यासाठी उपचार घेतात. पण त्यांना याचा काहीच फायदा होत नाही.

पण तुम्हाला माहीत आहे का की, त्यातील कमतरतांकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला जीव मुठीत धरून महागात पडावे लागू शकते?व्हिटॅमिन B12 शरीरासाठी इतके आवश्यक आहे की त्याच्या कमतरतेमुळे शरीर योग्यरित्या कार्य करू शकत नाही. अशा वेळी जर दीर्घकाळ उपचार न केल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

मानसिक आरोग्यावर होतो परिणाम

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे नैराश्य आणि स्मृतिभ्रंश यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होण्याचा आणि मेंदू योग्य प्रकारे काम न करण्याचा धोकाही वाढतो.

हृदयविकार

हृदयविकार हे आज मृत्यूचे सर्वात मोठे कारण असून काही अभ्यासांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता हृदयविकाराच्या वाढीव जोखमीशी जोडली गेली आहे.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

जर तुम्हाला थकवा, अशक्तपणा, हात-पायांमध्ये मुंग्या येणे किंवा उदासीनता यांसारखी लक्षणे दीर्घकाळ जाणवत असल्यास तुमच्या व्हिटॅमिन बी12 ची चाचणी करा. या समस्या लवकर ओळखून आणि उपचार केला तर ते टाळता येऊ शकते.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्याचे मार्ग

व्हिटॅमिन बी 12 नैसर्गिकरित्या मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळत असून शाकाहारी लोकांसाठी, व्हिटॅमिन बी 12 किंवा व्हिटॅमिन बी 12 सप्लिमेंटने मजबूत केलेले पदार्थ खाणे फायदेशीर ठरते.

Leave a Comment