Vitamin B12 Deficiency : सावधान! ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता ठरू शकते आरोग्यासाठी हानिकारक, वेळीच द्या लक्ष

Vitamin B12 Deficiency : आपल्या शरीराला व्हिटॅमिनची खूप गरज असते. जर शरीराला व्हिटॅमिनची कमतरता असेल तर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर अनेक आजार निर्माण होतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. याच्या कमतरतेमुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि ती दूर करण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करता येईल हे जाणून घेऊया सविस्तरपणे.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे

जिभेवर जखमा होण्यासोबतच ते जास्त स्निग्ध होणे हे व्हिटॅमिन बी12 चे लक्षण आहे. तसेच शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे दिसणारी काही सामान्य लक्षणे दिसतात.

  • त्वचेचा पिवळसरपणा
  • थकवा जाणवणे
  • भूक न लागणे
  • चक्कर येणे
  • वजन कमी होणे
  • धाप लागणे

शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तुम्ही एखाद्या मोठ्या गंभीर आजाराला बळी पडू शकता. या आजाराचे नाव ॲनिमिया असून शिवाय तुम्ही इतर अनेक आजारांना बळी पडू शकता.

शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे, पुरेशा लाल रक्त पेशी नसतात, त्या तयार करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन बी 12 ची खूप गरज असते. ज्यावेळी शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता असते त्यावेळी शरीराला आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही. अशाप्रकारे तुम्ही ॲनिमियाचे शिकार बनता. असे झाले तर शरीरात अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

या पदार्थांचे करा सेवन

समजा जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 या जीवनसत्वाची कमतरता असेल तर तुम्ही तुमच्या आहारात मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकता. इतकेच नाही तर तुमच्यासाठी ब्रोकोली, सोयाबीन, मशरूम, चीज, ओट्स खूप फायदेशीर ठरू शकते.

Leave a Comment