T20 World Cup 2024 मधून Virat Kohli होणार बाहेर? निवडकर्ते उचलणार मोठे पाऊल 

T20 World Cup 2024 :  T20 World Cup 2024 ची सुरुवात जून महिन्यात होणार आहे. यावेळी या स्पर्धेचे आयोजन यूएसए आणि वेस्ट इंडीज यांच्याकडून करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघ रोहित शर्मा याचे नेतृत्वाखाली खेळणार आहे.

मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली या स्पर्धेचा भाग नसणार आहे. संघातून त्याला बाहेर केलं जाऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.  वृत्तानुसार बीसीसीआयचे निवडकर्ते विराटच्या निवडीवर मोठा निर्णय घेऊ शकतात.

विराट कोहली आणि रोहित शर्मा 2022 च्या T20 विश्वचषकातील उपांत्य फेरीपासून T20 क्रिकेट खेळले नव्हते. पण अलीकडेच दोघांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मध्ये तब्बल 15 महिन्यांनंतर पुनरागमन केले. या काळात रोहितने चांगली कामगिरी केली, पण विराटला मालिकेत यश मिळू शकले नाही. मात्र, याआधी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आणि निवडकर्त्यांनी रोहित आणि विराटशी संपर्क साधला होता की त्यांना टी-20 खेळायचे आहे, त्यानंतर दोघांनीही होकार दिला.

स्वप्न होणार पूर्ण! ‘ह्या’ बँका देत आहे कमी व्याजदरात गृहकर्ज; पहा संपूर्ण लिस्ट

रिपोर्टनुसार, विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये संघाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. वास्तविक, मुख्य निवडकर्त्याने विराटशी त्याचा दृष्टिकोन बदलण्याबाबत बोलले होते. यानंतर विराटला अफगाणिस्तान मालिकेत आक्रमक क्रिकेट खेळायचे होते, पण त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत आता विराट कोहलीला आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दमदार कामगिरी करावी लागणार आहे.”ही एक अतिशय नाजूक बाब आहे आणि बरेच लोक त्यात सामील होण्यास इच्छुक नाहीत,” सूत्राने सांगितले.

याबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआयचे मुख्य प्रशिक्षक अजित आगरकर यांना घ्यायचा आहे. कारण बीसीसीआयचे उच्चपदस्थ अधिकारी त्यात सहभागी होऊ इच्छित नाहीत.

Big Breaking! भारतीय हवाई दलाचे विमान जैसलमेरमध्ये कोसळले

अशा परिस्थितीत विराटने आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी केली नाही तर त्याला संघातून काढून टाकले जाऊ शकते. विराट कोहलीने T20 मध्ये 4000 हून अधिक धावा केल्या आहेत आणि असे करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

Leave a Comment