Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आयसीसी स्पर्धेत (World Cup 2023) आणखी एक मोठा विक्रम झाला आहे. टीम इंडियाच्या (Team India) या दिग्गज खेळाडूने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आणि तो आपल्या नावावर केला. आता आयसीसी (ICC) टूर्नामेंटमध्ये कोहली सर्वांच्या पुढे गेला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या स्थानावर असला तरी तो विराट कोहलीच्या खूप मागे आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील पहिल्या सामन्याची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळली गेली होती परंतु विश्वचषक सामना पूर्णपणे वेगळा ठरला. टीम इंडियाच्या सुपरस्टारने या सामन्यात आपली ताकद दाखवण्यासाठी अशी संधी निवडली जेव्हा आघाडीचे तीन फलंदाज खाते न उघडताच माघारी परतले होते.
भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचा डाव 199 धावांत आटोपला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि आघाडीच्या तीन फलंदाजांना खाते न उघडताच माघारी धाडले. येथे विराट कोहलीने आघाडी घेतली आणि नावाप्रमाणे फलंदाजी केली. येथे त्याने टीम इंडियाला अडचणीतून तर सोडवलेच पण आयसीसी टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडला.
विराट कोहली सचिनच्या पुढे
विराट कोहली आता ICC टूर्नामेंटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आयसीसी टूर्नामेंटमध्ये 58 डावात 2719 धावा केल्या होत्या. हा विक्रम विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना मोडला. या फलंदाजाने आयसीसी टूर्नामेंटच्या 64 व्या डावात 2720 धावा करत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. 64 डावांनंतर त्याच्या खात्यात 2422 धावा जमा आहेत.