Virat Kohli : विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म टीम इंडियासाठी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) आधी किती फायदेशीर ठरला आहे, हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात दिसून आले. या सामन्यात विराट कोहलीने संघाला 6 विकेटने विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. कोहलीने 48 बॉलमध्ये 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 63 रन केले.
यशस्वी धावांचा पाठलाग करताना विराट कोहली T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. T20 मध्ये पाठलाग करताना विराट कोहलीने 37 सामन्यांच्या 34 डावांमध्ये 90.35 च्या सरासरीने 1536 रन केले आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये धावांचा पाठलाग करताना, कोहलीने आतापर्यंत एकही शतक केलेले नाही, परंतु त्याने 15 अर्धशतके केली आहेत आणि सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 94 आहे. त्याच वेळी, त्याचा स्ट्राइक रेट 135.33 आहे.
यशस्वी धावांचा पाठलाग करताना विराट कोहली T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, तर डेव्हिड वॉर्नर (David Warner) दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 1195 धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी 41.20 आहे. तिसर्या क्रमांकावर रोहित शर्मा (Rohit Sharma) 1193 धावांसह आहे, ज्याने 29.82 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर आता टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान राहणार आहे. दोन्ही संघातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या सामन्यांतही रोहित शर्मा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष राहणार आहे.