मुंबई- भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Former captain Virat Kohli) पुन्हा एकदा वादात सापडला आहे.(Virat Kohli in the spotlight again, now due to this new controversy, fans trolled him)
रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ( Against South Africa Last ODI) तिसर्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या एका चुकीमुळे चाहते (Fan’s) नाराज झाले. यानंतर लोकांनी बीसीसीआयकडे (BCCI) विराटवर कारवाई करण्याची मागणीही केली.
केपटाऊनमध्ये सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत (the National anthem) वाजत होते. यावेळी सर्व खेळाडू एकत्र उभे राहून राष्ट्रगीत गाताना दिसले जे ब्रॉडकास्टरच्या कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र, यावेळी विराट कोहली च्युइंगम (Chewing gum) चघळताना दिसला. कॅमेऱ्याच्या वेगवेगळ्या अँगलमधून घेतलेल्या शॉटमध्ये विराट दोनदा दिसला आणि दोन्ही वेळा तो एकच काम करताना दिसला. लोकांना विराटचे हे कृत्य आवडले नाही आणि तो ट्रोल होऊ लागला.
विराटच्या या कृत्याचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. (Virat Kohli in the spotlight again, now due to this new controversy, fans trolled him)