Virat Kohli : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळला जात आहे. या कसोटीत वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 गडी गमावून 288 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच किंग कोहलीने 13 धावा करत इतिहास रचला आहे.
विराट कोहलीची ही कसोटी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 500 वा सामना आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 सामने खेळणारा तो जगातील 10वा आणि भारतातील चौथा खेळाडू ठरला आहे. विराटने 13 धावा करताच कारकिर्दीतील 76 वे शतक पूर्ण केले. जो खूप मोठा विक्रम आहे. पण आपण ज्या रेकॉर्डबद्दल बोलत आहोत ते वेगळेच आहे.
विराटने शतक पूर्ण करताच वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावताना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिसची बरोबरी केली. कोहली आणि कॅलिस यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण 12 शतके झळकावली आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्याने विंडीजविरुद्ध एकूण 13 शतके झळकावली आहेत. हे तिन्ही फॉरमॅट एकत्र करून केलेल्या शतकांची संख्या आहे.
तिन्ही फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
सुनील गावस्कर – 13 शतके
विराट कोहली – 12 शतके
जॅक कॅलिस – 12 शतके