Vice President Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांना जोरदार धक्का देणारा भाजप उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Vice President Election In India) शनिवारी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारांच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात संसदीय मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजप (BJP) आता कोणत्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विशेष म्हणजे, भाजप नेतृत्वातील एनडीएकडे (NDA) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार (Candidate) जिंकण्यासाठी पुरेसे संख्याबळ आहे. याशिवाय, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही भाजपला काही बिगर-काँग्रेस विरोधी पक्ष जसे की बीजेडी (BJD) आणि वायएसआर काँग्रेसचा (YSR Congress) पाठिंबा मिळेल, असा विश्वास आहे. संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पक्षाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. संसदीय मंडळाच्या बैठकीआधी किंवा दरम्यान या निर्णयाची माहिती सहकाऱ्यांनाही दिली जाईल.
BJP : 2024 साठी भाजपने केला मोठा प्लान.. ‘त्या’ 141 मतदारसंघांसाठी आखली ‘ही’ रणनिती; जाणून घ्या.. https://t.co/RE1z2Msxo9
— Krushirang (@krushirang) July 16, 2022
उपाध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवाराबाबत अनेक नावांची चर्चा आहे. अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाचा नुकताच राजीनामा दिलेले मुख्तार अब्बास नक्वी, केरळचे राज्यपाल यांचीही नावे घेतली जात आहेत. या क्रमवारीत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे या तिघांपैकी एकाला किंवा आणखी कुणाचे नाव जाहीर होणार याबाबत उत्सुकता आहे.
Vice President Election : कोण असेल उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ? ; पहा, कोण आहे आघाडीवर.. https://t.co/01NdQap0ZF
— Krushirang (@krushirang) July 14, 2022
तसे पाहिले तर, विरोधी पक्षांना नेहमीच धक्का देणारे राजकीय निर्णय भाजपकडून घेतले जातात. याआधी विरोधकांनी अनेक वेळा याचा अनुभव घेतला आहे. आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही असाच आश्चर्यकारक निर्णय घेतला जाणार का, याचीही चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.