मुंबई: टेलीकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी कमी किंमतीत अनेक उत्तम प्लान उपलब्ध करून देत आहेत. कमी किंमतीत येणारे हे वीआई प्लान्स ग्राहकांना भरघोस डेटा ऑफर करते आहे. जर तुम्ही आणखी डेटा वाला प्लान शोधात आहात तर तुम्हाला वोडाफोन आयडियाकडे उपलब्ध असणारा 901 रुपयेचा रीचार्ज प्लान आवडू शकतो. तर चला जाणून घेऊयात या प्लान विषयी व यासोबत मिळणाऱ्या लाभाविषयी.
Vi 901 प्लानचा तपशील
या वीआई प्रीपेड प्लानसोबत दररोज 3 जीबी हाई-स्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि प्रतिदिन 100 एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे.
वैलिडिटी
901 रुपयाच्या प्लानसोबत वोडाफोन आयडियाकडून ग्राहकांना 70 दिवसांची वैलिडिटी दिली जात आहे. प्रतिदीन 3 जीबी हाई-स्पीड डेटानुसार एकूण 210 जीबी डेटा दिला जातो. याशिवाय हा प्लान ग्राहकांना 48 जीबी अतिरिक्त डेटा सुद्धा देत आहे.
इतर बेनिफिट्स
जर तुम्ही OTT प्रेमी असाल तर हा प्लान तुम्हाला आवडू शकतो. वीआई प्लान सोबत कंपनी 1 वर्षासाठी डिस्ने प्लस हॉटस्टारचाही फायदा आपणाला देणार आहे. शिवाय ग्राहकांना वीकेंड डेटा रोलवर, बिंज ऑल नाइट के अंतर्गत रात्री १२ वाजता ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्फिंग, स्ट्रीमिंग आणि शेअरिंग आशा सुविधाही मिळणार आहेत. शिवाय वीआई चित्रपट आणि टीव्हीचा मोफत एक्सेस आणि डेटा डिलाइट का फायनल तुम्ही या प्लानसोबत घेऊ शकता.
Vi 601 योजना
या वीआई प्रीपेड प्लानवर दररोज 3 जीबी हाई-स्पीड डेटा मिळतो. यासोबत कोणत्याही नेटवर्कवर मोफत अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन 100 एसएमएस प्राप्त होतात. या प्लानबरोबर तुम्हाला 28 दिवसांची वैलिडिटी मिळणार आहे. या हिशोबाने पाहिले तर 84 जीबी हाई-स्पीड डेटा मिळणार आहे. 601 रुपयाच्या या प्लानबरोबर ग्राहकांना देखील 1 वर्षांची डिस्ने+ हॉटस्टार सोबत फायदे ऑफर करत आहे.
- हेही वाचा:
- Jio वापरकर्त्यांना मोठा धक्का; आता Disney+ Hotstar मोफत बघता येणार नाही, जाणून घ्या यामागचे कारण
- न्यूझीलंडविरुद्ध टी 20 सामन्यांची मालिका आजपासून; भारताच्या ‘या’ खेळाडूंनी केला कसून सराव