Diabetes : मधुमेहींसाठी वरदान आहेत ‘या’ भाज्या, अशाप्रकारे करा सेवन

Diabetes : जर आपली रक्तातील साखर नियंत्रित झाली नाही तर आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण तुम्ही जाही भाज्यांचे सेवन करून रक्तातील साखर नियंत्रित ठेवू शकता.

पालक

पालक या भाजीमध्ये मॅग्नेशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन के, फोलेट आणि इतर आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात.

असा करा वापर : तुम्ही हे सॅलड, सूप किंवा भाजी म्हणून खाऊ शकता.

भेंडी

भेंडीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट असून ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. भेंडीमध्ये पेक्टिन नावाचा विरघळणारा फायबर असतो यामुळे साखरेचे शोषण कमी होते.

असा करा वापर : तुम्ही भेंडी वेगवेगळ्या प्रकारे शिजवून खाल्ली जाऊ शकते, जसे की भाजी, करी किंवा सूपमध्ये घालून तुम्ही याचे सेवन करू शकता.

कारले

कारल्यात मोमोर्डिसिन आणि कॅरोटीन नावाचे संयुगे असून ते इंसुलिनसारखे कार्य करतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास खूप मदत करतात.

असा करा वापर : तुम्ही कारल्याचा रस बनवून किंवा भाजी म्हणून खाऊ शकता.

ब्रोकोली

खरंतर ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन नावाचे संयुग असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. तसेच यात फायबर आणि व्हिटॅमिन सी देखील जास्त प्रमाणात असते.

असा करा वापर : तुम्ही आता हे सॅलड, सूप किंवा साइड डिश म्हणून खाऊ शकता.

मुळा

विशेष म्हणजे मुळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, जे रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास खूप मोठी मदत करते. मुळ्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे.

असा करा वापर : तुम्ही कच्चा मुळा सॅलड, सूप किंवा भाजी म्हणून खाऊ शकता.

Leave a Comment