मुंबई: शिवाजी महाराजांच्या इतिहासाचाच एक भाग असणाऱ्या प्रतापराव गुजर यांचं कथानक प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. या चित्रपटाच्या कथानकावरही आक्षेप घेतला जात असताना चित्रपटातील एक स्क्रीनशॉट शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी यावरून खोचक ट्वीट केलं आहे.
या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून त्याआधीच चित्रपटाची मोठी चर्चा झाली आहे. त्यात आता जितेंद्र आव्हाडांनी चित्रीकरणादरम्यानच्या एका दृश्यातला फोटो शेअर केला आहे. यामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, त्याच्यामागे लावलेल्या झुंबराला बल्ब लावल्याचं दिसून येत आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी खोचक टोला लगावला आहे. “बल्बचा शोध कधी लागला? काय थट्टा लावली आहे? मराठी माणसाला वेड्यात काढत आहेत”, असं जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
must read