Vasant More । बिग ब्रेकिंग! वसंत मोरेंना ठाकरेंनी दिला ‘हा’ शब्द, आज हाती घेणार मशाल

Vasant More । अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या घवघवीत यशामुळे महाविकास आघाडीत इनकमिंग सुरु झाली आहे. विधानसभेपूर्वी महायुतीतील अनेक राजकीय नेते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होत आहेत.

आज वसंत मोरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे मागील आठवड्यात त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपण पक्षात पक्ष प्रवेश करू इच्छितो असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडूनदेखील याबाबत सकारात्मक संकेत दिले होते.

दरम्यान, आज सकाळी वसंत मोरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, “मी आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. मी कोणत्याही पदाधिकाऱ्याला माझ्यासोबत येण्याची बळजबरी केली नाही. ज्यांना माझ्यासोबत यायचंय ते येतील. ज्यांना यायचं नाही ते येणार नाहीत. मला ठाकरे गटाकडून कोणताही शब्द मिळालेला नाही. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार काम करत राहीन,” असं स्पष्टीकरण मोरे यांनी दिले आहे.

माहितीनुसार, वसंत मोरे १०० गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे निघाले असून त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या गाडीवर मशाल चिन्हाचे स्टीकर लाले आहे. वसंत मोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश आज दुपारी बाराच्या दरम्यान मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होणार आहे.

दरम्यान, वसंत मोरे या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, पण उमेदवारी न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी घेतली होती. आता ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहे.

Leave a Comment