Useful leaves for heat treatment | उन्हाळा (summer tips )चांगलाच वाढला आहे. अजूनही दोन महिने उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. अनेक लोकांना उष्णतेचा त्रास (heat problem) जाणवतो आणि शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा त्रास फारच वाढतो. आपल्या शरीरामध्ये जर उष्णता असेल, तर त्याचे आपल्या शरीरावरती अनेक वाईट परिणाम होतात आणि त्यामध्ये अशा लोकांची त्वचा (skin)खराब होते. त्या त्वचेवरती खाज सुटते, जास्त घाम जातो, परिणामी बॉडी डीहायड्रेट (body dehydration)बनते, पायही कोरडे पडतात आणि पायाला जास्त भेगा पडतात, केसांची गळती होणे ही समस्या वाढते आणि डोळ्यांचे आजार, जसे की, डोळे लाल होणे, डोळे कोरडे पडणे, त्याला खाज सुटणे, अशा प्रकारचे अनेक आजार या उष्णतेमुळे होत असतात. ही उष्णता कशा प्रकारे अगदी सहज दूर करता येऊ शकते.
Useful leaves for heat treatment मध्ये उपयोगी ठरतात ही पाने
एक अशी वनस्पती आहे ज्याची दोन पाने खाल्लीत तर उष्णतेच्या विकारांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. ही वनस्पती म्हणजे कडूनिंब. (Neem tree)कडुनिंबाच्या पानांमध्ये उष्णतेच्या आजारांपासून संरक्षण करण्याची ताकद असते. कडुनिंबाच्या झाडामध्ये आपल्याला होणारे सर्व रोग नष्ट करण्याचे गुणधर्म आहेत आणि म्हणून याला सर्व रोग निवारिणी असं म्हटलेल आहे.
Useful leaves for heat treatment | उष्णता कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर एक ते दोन ग्लास पाणी प्यायचे आहे. हे पाणी पिऊन झाल्यानंतर कडुनिंबाची दोन पाने चावून चावून खायची आहेत. कडुनिंबाचा पूर्ण रस पोटात जाईल इतका वेळ पाने चघळायची आहेत. रोज दोन ते तीन पानं खाल्ली तर तुम्हाला उन्हाळा त्रासदायक होणार नाही. ही पाने खाल्यानंतर अर्धातास काहीही खायचे नाही किंवा प्यायचे नाही याची काळजी घ्या. त्यानंतर मात्र तुम्ही नाष्टा करू शकता.
तर असा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. आरोग्य (Health tips) चांगले ठेवायचे तर उन्हाळ्यात फीट रहा. शरीरातील उष्णतेवर एका आठवड्यात तुम्हाला फरक दिसू लागेल. तुम्हाला जाणवेल की ही उष्णता कमी होऊ लागली आहे. कायमस्वरूपी उष्णतेचा त्रास होत असेल तर हा उपाय तुम्ही नेहमी करू शकता.