Useful Government Apps : कामाची बातमी! प्रत्येक वापरकर्त्यांकडे असावीत ‘ही’ ॲप, कसलीच अडचण नाही येणार

Useful Government Apps : हल्ली सर्वांकडे स्मार्टफोन आहेत. अशी काही ॲप आहेत जी प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्यांकडे असावीत. जेणेकरून त्यांना भविष्यात कसलीच अडचण येणार नाही. कोणती आहेत ही ॲप जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.

डिजीलॉकर

डिजीलॉकरला प्ले स्टोअरवर 4.1 स्टार रेटिंग मिळाले असून या अधिकृत ॲपला आतापर्यंत 464K पुनरावलोकने आणि 50M+ पेक्षा जास्त डाउनलोड मिळाले आहेत. हे लक्षात घ्या की हे एक अधिकृत ॲप डॉक्युमेंट वॉलेट आहे. या ॲपवर तुम्ही तुमची आधार कार्ड, पॅन कार्ड, 10वी-12वीची मार्कशीट, ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्टकॉपी ठेवू शकता.

MyGov

Play Store वर MyGov ॲपला 4.3 स्टार रेटिंग मिळाले असून या अधिकृत ॲपला आतापर्यंत 66K पुनरावलोकने आणि 5M+ पेक्षा जास्त डाउनलोड मिळाले आहेत. ॲपच्या माध्यमातून नागरिकांना प्रत्यक्ष सहभागाची संधी मिळते. याद्वारे केंद्रीय मंत्रालये आणि त्यांच्या संस्थांसमोर कोणत्याही कल्पना, सूचना, टिप्पण्या मांडता येतात.

मतदार हेल्पलाइन

व्होटर हेल्पलाइन ॲपला प्ले स्टोअरवर 3.7 स्टार रेटिंग मिळाले असून भारतीय निवडणूक आयोगाच्या ॲपला 387K पुनरावलोकने आणि 50M+ पेक्षा जास्त डाउनलोड मिळाले आहेत. या ॲपद्वारे भारतीय नागरिक मतदानाशी संबंधित सेवा वापरू शकतात.

mAadhaar

mAadhaar ला Play Store वर 3.4 स्टार रेटिंग मिळाले असून ॲपला आतापर्यंत 353K पुनरावलोकने आणि 50M+ पेक्षा जास्त डाउनलोड मिळाले आहेत.
तुमचे आधार कार्ड ॲपमध्येच उपलब्ध असेल, जे गरजेनुसार कधीही, कुठेही वापरले जाते.

उमंग

उमंग ॲपला प्ले स्टोअरवर 4.0 स्टार रेटिंग मिळाले असून ॲपला 328K पुनरावलोकने आणि 50M+ पेक्षा जास्त डाउनलोड मिळाले आहेत. UMANG (न्यू-एज गव्हर्नन्ससाठी युनिफाइड मोबाईल ऍप्लिकेशन) सह, भारतीय नागरिक संपूर्ण भारतातील ई-सरकारी सेवांमध्ये प्रवेश करता येतो.

BHIM

BHIM ॲपला प्ले स्टोअरवर 4.1 स्टार रेटिंग मिळाले असून या अधिकृत ॲपला आतापर्यंत 1.67M पुनरावलोकने आणि 100M+ पेक्षा जास्त डाउनलोड मिळाले आहेत. BHIM एक UPI ॲप आहे. हे ॲप सरकारने नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ डिजिटल पेमेंट करण्यासाठी तयार केले आहे.

Leave a Comment