US-China Balloon Politics: दिल्ली : भारताचा मुजोर शेजारी चीनला अमेरिकेने एक झटका दिल्याने सध्या हे दोन्ही देश जगभरात चर्चेत आहेत. त्याला निमित्त आहे चिन्यांचा फुगा फोडण्याचे. होय, अमेरिकेने शनिवारी रात्री उशिरा उत्तरेकडील प्रदेशात फिरणारा संशयित चिनी गुप्तहेर बलून फोडला आहे. अमेरिकेने थेट एक क्षेपणास्त्र डागून हा गुप्तचर फुगा अटलांटिक महासागरात फोडला आहे. यासोबतच अमेरिकन एजन्सीने फुग्याचे अवशेष शोधून ते ताब्यात घेण्यासाठी एक खास टीमही पाठवली होती. मात्र, यामुळे चिडलेल्या चीननेही यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे फुगा प्रकरण आता कुठपर्यंत जाणार की यातलाही फुगा फुटणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
- Gold Investment साठी ‘हे’ आहेत खास पर्याय; काळजी नको, मिळेल चांगला नफा
- IPL 2023 : सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ? ; रोहित शर्मा नाही तर..
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
चीनने याबाबत म्हटले आहे की, “या प्रकरणावर असंतोष व्यक्त करून अमेरिकेने मानवरहित नागरी हवाई फुगा यावर जबरदस्तीने केलेल्या कारवाईचा ठाम विरोध करतो.” चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला स्पष्ट धमकी देताना म्हटले आहे की, “अमेरिकेने आमच्या गुप्तचर फुग्याला दिलेली अशी प्रतिक्रिया अत्यंत टोकाची आहे आणि याद्वारे आंतरराष्ट्रीय हितांचे उल्लंघन झालेले आहे. आम्ही यापुढील प्रकरणी ती आवश्यक प्रतिक्रिया देण्याचा अधिकार देखील राखून ठेवतो आहोत.” दरम्यान, पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत सांगितले की, काही दिवसांपासून उत्तर अमेरिकेच्या आकाशात उडणारा एक गुप्तचर फुगा F-22 या लढाऊ विमानाने डागलेल्या क्षेपणास्त्राने पाडण्यात आला. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनीही याबाबत सांगितले की, ही कारवाई देशाच्या अधिकारक्षेत्रात होती. चीनने स्वायत्ततेचे उल्लंघन केल्यामुळे आम्ही ही कारवाई आहे आली.
विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, चीनचा हा गुप्तचर फुगा (बलून) मोंटानाच्या क्षेपणास्त्र क्षेत्रावरून जात होता. अमेरिकेची काही महत्त्वाची शस्त्रेही याच भागात ठेवण्यात आलेली आहेत. मात्र, यावर अमेरिकेचे म्हणणे आहे की या प्रदेशातून गोळा केलेली माहिती ही चीनसाठी खूपच मर्यादित आहे. अशा प्रकारची घुसखोरी कोणत्याही देशाकडून खपवून घेतली जाऊ शकत नाही. दरम्यान, शनिवारी अमेरिकेच्या लढाऊ विमानाने एका संशयित चिनी गुप्तहेर फुग्याला दक्षिण कॅरोलिनाच्या किनारपट्टीवर पाडले. फुगा खाली पाडल्यानंतर काही वेळातच या घटनेच्या नेमक्या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. अमेरिकन फायटर जेटने एका संशयित चिनी गुप्तहेराचा बलून एका फटक्यात कसा फोडला हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अमेरिकन हल्ल्यानंतर फुग्याचे तुकडे होऊन ते समुद्रात पडले आहेत. रिअल फोटोहोलिक नावाच्या इंस्टाग्राम वापरकर्त्याने कॅप्चर केलेला हा व्हिडिओ असे स्पष्टपणे दाखवतो की, अमेरिकेतील लँगली एअर फोर्स बेसवरून F-22 फायटर जेटने डागलेल्या क्षेपणास्त्राने चिनी पाळत ठेवणारा बलून कसा पाडला गेला आहे.
एका अमेरिकन अधिकाऱ्याचा हवाला देत सीएनएन वाहिनीने वृत्त दिले आहे की, अमेरिकेने अटलांटिक महासागरावर फिरणारा हा चिनी गुप्तहेर बलून खाली पाडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी फुगा खाली पाडण्यास मान्यता दिल्यावर ही अमलबजावणी लष्करी अधिकार्यांनी केली. फुगा सोडण्याच्या या संशयास्पद कारवाईनंतर बिडेन म्हणाले, बुधवारी मला जेव्हा फुग्याबद्दल सांगण्यात आले तेव्हा मी पेंटागॉनला तो लवकरात लवकर फोडण्याचे आदेश दिले. फुगा फोडणाऱ्या आमच्या सैनिकांचे अभिनंदन करायचे आहे. दरम्यान, एका अमेरिकन अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याला कॅरोलिनासच्या किनार्याजवळ या आठवड्याच्या सुरुवातीला मोंटानाच्या आकाशात हा फुगा पहिल्यांदा दिसला होता. हा फुगा खाली पाडण्यापूर्वी फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने नॉर्थ कॅरोलिनामधील विल्मिंग्टन, दक्षिण कॅरोलिनामधील चार्ल्सटन आणि दक्षिण कॅरोलिनातील मर्टल बीच येथे विमानतळांसाठी ग्राउंड स्टॉप जारी करण्यात आला. म्हणजेच येथील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले झाले होते. तर, अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या सूचनेनंतर अमेरिकन लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात दक्षिण कॅरोलिनाच्या किनार्यावरील समुद्रावर एक चिनी पाळत ठेवणारा बलून खाली पाडला आहे.
सुमारे तीन बसेसच्या आकारमानाचा हा फुगा परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या चीन दौऱ्याच्या आधी दिसला. पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी याबाबत सांगितले की, यावर गुप्तचर लक्ष ठेऊन आहेत. दुसरीकडे चीनने म्हटले की, हा फुगा आपला मार्ग चुकला आणि अमेरिकन प्रदेशात पोहोचला आहे. पण अमेरिकेने ते गांभीर्याने घेतले आणि ब्लिंकनने चीनचा दौरा रद्द केला आहे. पेंटागॉनच्या प्रवक्त्याने सांगितले होते की NORAD (नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड) ही या गुप्तचर फुग्यावर बारीक लक्ष ठेवून होती. गुरुवारी मोंटानामध्ये हा फुगा दिसल्यावर अमेरिकन सरकारने संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यासाठी तत्काळ ही कारवाई केली. हा फुगा व्यावसायिक हवाई क्षेत्रापेक्षा उंच खूप आहे आणि त्यामुळे जमिनीवरील लोकांना याचा कोणताही धोका नाही.
याबाबत अधिक माहिती देताना पेंटागॉनने सांगितले की, गुप्तचर बलून काही दिवसांपूर्वी चीनमधून अलास्काजवळील अलेउटियन बेटांवर आला. येथून उत्तरहा फुगा पश्चिम कॅनडामार्गे मोंटाना शहरात पोहोचला. हा फुगा दीर्घकाळ देशात राहू शकत होता. मात्र, चीनने कबूल केले की हा फुगा रस्ता चुकला आणि हवेने अमेरिकेत पोहोचला होता. त्याचबरोबर त्यांनी या मुद्द्यावर सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते यांनी म्हटले आहे की, पुढील आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांचा चीन दौरा रद्द करणे ही दुर्दैवी घटना आहे. अमेरिकेच्या आकाशातून उडणाऱ्या संशयित चिनी गुप्तहेरांच्या फुग्यांवरून झालेल्या राजकीय गोंधळामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक चर्चा खूप विस्कळीत झाली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च मुत्सद्दी डॅनियल रसेल यांनी म्हटले आहे की, चीन-अमेरिका संबंध स्थिर करण्याच्या प्रयत्नांसाठी कोणताही दीर्घकालीन उपाय दिसत नाही. या घटनेमुळे दोन्ही देशांचे राजनैतिक संबंध आणखी बिघडले आहेत.