UPI Payment: भारतात शॉपिंगसाठी, जेवणासाठी किंवा इतर आर्थिक व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पद्धतीने व्यवहार होत आहे. लोक घरी बसून काही मिनिटातच हजार रुपयांचे आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करत आहे.
मात्र ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट आवश्यक आहे. जर इंटरनेट नसेल तर आपण यूपीआय पेमेंट करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला या लेखात एक नवीन पद्धतीबद्दल माहिती देणार आहोत. त्याद्वारे तुम्ही इंटरनेट शिवाय देखील सहज यूपीआय पेमेंट करू शकतात. चला मग जाणून घ्या या पद्धतीबद्दल सविस्तर माहिती.
इंटरनेटशिवाय UPI पेमेंट
आरबीआयने इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्यासाठी UPI Lite फीचर सुरू केले आहे. त्याच्या मदतीने तूम्ही सहज इंटरनेटशिवाय आर्थिक व्यवहार करू शकतात. UPI Lite UPI प्रमाणेच कार्य करते, परंतु ते थोडे सोपे आणि जलद आहे.
UPI Lite फीचर
UPI Lite द्वारे, वापरकर्ते आधीच वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकतात आणि नंतर इंटरनेटशिवाय पैसे व्यवहार करू शकतात. UPI Lite द्वारे पेमेंट करण्यासाठी, तुम्हाला पिन टाकण्याची आवश्यकता नाही.
2 हजार रुपयांपर्यंत मर्यादा
आम्ही तुम्हाला सांगतो की UPI Lite द्वारे एकावेळी 200 रुपयांपर्यंत पैसे दिले जाऊ शकतात, तर फक्त 2,000 रुपये जोडण्याची मर्यादा आहे. तुम्ही एका दिवसात 2,000 रुपये वापरले असल्यास, तुम्ही पुन्हा 2,000 रुपये जोडू शकता.
फीचर फोन वापर
याशिवाय फीचर फोन वापरणारे लोक IVR नंबरद्वारे UPI व्यवहार करू शकतात. यामध्येही इंटरनेटच्या मदतीने व्यवहार होतात. सर्वप्रथम तुम्हाला IVR क्रमांक 080 4516 3666 किंवा 6366 200 200 वर कॉल करून तुमचा UPI आयडी व्हेरिफाय करावा लागेल. त्यानंतर तुम्ही कॉलवर दिलेल्या सूचनांचे पालन करून तुमचे पेमेंट करू शकता.