UPI Fraud: सावध राहा, होत आहे UPI फसवणूक; काही मिनिटांत बँक खाते होणार रिकामे

UPI Fraud : देशात आज अनेकजण घरी बसून ऑनलाइन शॉपिंग करत आहे तर काहीजण घरी बसूनच जेवणाची ऑर्डर देत आहे आणि पेमेंट यूपीआयमार्फत करत आहे.

जर तुम्ही देखील घरी बसून ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुम्हाला आता या डिजिटल युगात सावधान व्हावे लागणार आहे नाहीतर काही मिनिटातच तुमचे बँक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे.

सध्या देशात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच देशातील बँकिंग संस्था आणि बँका अशा प्रकारचे नवनवीन घोटाळे टाळण्यासाठी ग्राहकांना वेळोवेळी अलर्ट देत असतात.आजकाल एका वेगळ्या पद्धतीने नवा घोटाळा सुरू आहे. त्याबाबत बँकेने ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. ICICI बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना ‘न्यू UPI ॲप’ घोटाळ्याबद्दल चेतावणी दिली आहे.

ग्राहकांनो, होळीपूर्वी खरेदी करा सोने, मिळत आहे खूपच स्वस्त; नवीन दर तपासा

UPI घोटाळ्यामुळे बँक खाती रिकामी होत आहेत

आजकाल लोकांना असे फोन येत आहेत ज्यात बँकिंगशी संबंधित माहिती मागवली जाते. यावेळी बहुतेक लोक ऑनलाइन बँकिंग वापरत आहेत, ज्यामुळे UPI देखील खूप लोकप्रिय आहे. सध्या सायबर फसवणुकीचा आणखी एक घोटाळा सुरू आहे.

सायबर मालवेअरच्या मदतीने ते फोनमध्ये इन्स्टॉल केलेल्या UPI ॲपला टार्गेट करत आहेत. त्यामुळे बँक खाते हॅक करून रिकामे केले जात आहे. अशा प्रकारे UPI घोटाळा होत आहे असे सायबर फसवणूक करणारे आता एसएमएस फॉरवर्डिंग ॲप्स तयार करतात, ज्यामध्ये नोंदणीसाठी UPI डिव्हाइस बंधनकारक मेसेज ग्राहकाच्या बँकेशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर पाठविला जातो आणि शेवटी तुम्हाला पेमेंट करण्यास सांगितले जाते.

बंपर डिस्काउंट! मारुती सुझुकीच्या ‘ह्या’ कार्स खरेदीवर होणार 80 हजारांची बचत

त्यामुळे युजरची UPI आयडी माहिती हॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल केले आहे. त्यामुळे महत्त्वाची माहिती हॅकरकडे जाते, त्यामुळे यूजरचे फोनवरील नियंत्रण सुटते.

Leave a Comment