Big Update on Adhaar Card: मुंबई : आधार कार्ड हे यत्र-तत्र-सर्वत्र पाहिजेच पाहिजे अशी भारताची स्थिती आहे. एकेकाळी या कार्डला विरोध करणारे भाजप हे कार्ड म्हणजेच ओळख असे म्हणत आहे. मात्र, त्यातही अनेक त्रुटी असल्याचे वेळोवेळी समोर आले. त्यावर चुप्पी साधत या कार्डसाठी अनेकांना लाइनमध्ये सरकारने उभे केले. मात्र, आता आता या आधार कार्डला एकाच झटक्यात निराधार करून टाकले आहे. होय, आता केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्डाची गरज यापुढे असणार नाही.
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Union Budget) संसदेत सादर केला. यंदाही त्यांनी मोठ्या घोषणा आणि मध्यम वर्गाला गोड वाटणाऱ्या योजनांची सरबत्ती जोमत केली. यंदाच्या अमृतकाळच्या या पहिल्या अर्थसंकल्पात (first budget of Amritkal) त्यांनी देशाला अच्छे दिन आल्याचीच घोषणा करणे बाकी राहिले आहे. आता देशाच्या विविध क्षेत्रांना गती देण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून अनेक मोठ्या घोषणा करतानाच अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. होय, ही घोषणा आधार कार्ड याबाबत आहे. कारण आता बँकेत, शाळेत, मोबाइल कंपन्या किंवा कुठेही आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्डाची बंधनकारक गरज भासणार नाही. (KYC norms permitted for the Unified Filing System)
आधार कार्ड याबाबत महत्वाची बातमी क्लिक करून वाचा..
तुमचा या बातमीवर विश्वास बसत नाही का..! अरे हो, ही बातमी सत्य आहे. कारण केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने करोना लसीकरण बंधनकारक केले आणि मग पुढे त्यातून आपली जबाबदारी झटकली. यासह पीएम केअर फंड यात सरकारी असल्याच्या पद्धतीने पैसे घेऊन नंतर तो खासगी असल्याचे म्हटले. तसेच आता आधार कार्ड याबाबत पाहायला मिळाले आहे. आता पॅन कार्डचा (PAN card) वापर सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींमध्ये समान ओळख म्हणून केला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केवायसीची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे, असे म्हटले जात आहे. सरकारच्या या नव्या निर्णयानुसार युनिफाइड फाइलिंग सिस्टीमसाठी परवानगी असलेले आणखी केवायसी मानदंड सुलभ होतील.
आपण पाहिले आहे की, आतापर्यंत अनेक ठिकाणी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक होते. तर, फक्त मोजक्या ठिकाणी जसे बँक किंवा वित्तीय कार्यवाही यासाठी पॅन आवश्यक होते. मात्र, आता नव्या निर्णयानंतर केवायसीची प्रक्रिया पॅनकार्डद्वारेच पूर्ण केली जाणार आहे. याविषयी बोलताना मंत्री निर्मला सीतारामन यांनी यामुळे व्यवसाय सुलभतेला चालना मिळेल असा दावा केला आहे. अर्थात भारतात पॅन कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र पुरावा आहे. फायनान्सशी संबंधित अनेक कामांमध्ये आपल्याला त्याची नेहमी विशेष गरज पडते. अगदी किसान क्रेडिट कार्ड काढण्यापासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापासून अनेक आर्थिक कामे करण्यासाठी या पॅन कार्डचा वापर केला जातो. याशिवाय नोकरी आणि सर्व बँकिंगपासून शिक्षणापर्यंतही अनेक महत्त्वाच्या कामांसाठी पॅनकार्डचा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत या कार्डची विशेष उपयुक्तता आपल्यासाठी खूप आहे. त्यालाच आता खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे.
एसबीआय बँक देत आहे दरमहा 80 हजार कामावण्याची संधी.. होय, क्लिक करून वाचा..
आपले बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक तपशील सध्या ज्या प्रकारे आधार कार्डमध्ये नोंदवले जातात. त्याच पद्धतीने आपली अनेक महत्त्वाची माहिती आता पॅनकार्डमध्येही नोंदवली जाते. त्यामुळेच याचा वापर वाढवणे आणि जनतेला केवायसी प्रक्रिया सुलभ वाटावी यासाठी असा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करताना, झग्गलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अविनाश रमेश गोडखिंडी यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतातील फिनटेक सेवांच्या वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पात केलेले प्रस्ताव खूप प्रशंसनीय आहेत. आधार, पीएम जन धन योजना, व्हिडिओ केवायसी, इंडिया स्टॅक आणि UPI यासह देशातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांनी फिनटेक सेवांची आणखी वेगाने भरभराट होईल. DigiLocker मध्ये उपलब्ध दस्तऐवजांची व्याप्ती वाढल्याने फिनटेक क्षेत्रात नावीन्यता सक्षम होणार आहे.
Read Car & Auto News and Tips in Hindi, Log On to Thegadiwala – Latest Car News & Reviews