मुंबई : देशातील वाहन बाजारात सध्या चारचाकी वाहनांना अच्छे दिन आले आहेत. कोरोनाचे संकट असतानाही कार विक्री बऱ्यापैकी होत आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेण्यासाठी वाहन कंपन्यांनी एक खास प्लान तयार केला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच पहिल्या तिमाहीत त्यांची नवीन वाहने बाजारात येणार आहेत. देशांतर्गत बाजारात मार्च 2022 पर्यंत Kia Carens MPV ते टोयोटा हिलक्स पिकअप ट्रकपर्यंत नवीन वाहने मार्केटमध्ये दाखल होणार आहेत.
किआ केरेन्स MPV
कंपनीने 14 जानेवारीपासून किआ केरेन्स कारसाठी बुकिंग सुरू केले असून 25,000 रुपये टोकन रक्कम भरून बुकिंग करता येईल. आता कंपनीने जाहीर केले आहे की, बुकिंग सुरू झाल्यापासून 24 तासांच्या आत कॅरेन्ससाठी 7738 बुकिंग्स घेतल्या गेल्या आहेत. येत्या काही दिवसात कंपनी ही कार देशात लाँच करणार आहे. 6 आणि 7 सीटर व्यवस्थेमध्ये येणाऱ्या या MPV ची अंदाजे किंमत 16-18 लाख रुपये आहे. किआ केरेन्सला किफायतशीर वाहन बनवण्यासाठी कंपनीने त्यात अनेक वैशिष्ट्ये दिली आहेत.
Kia Carence सोबत उपलब्ध असलेल्या तीन इंजिन पर्यायांपैकी सर्वात मजबूत 1.4 लिटर चार-सिलिंडर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. 6-स्पीड मॅन्युअलसह 7-स्पीड DCT गियरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याचा DCT प्रकार पॅडल शिफ्टर्ससह येतो. तुलनेत, हे वैशिष्ट्य केवळ महिंद्र मराझोच्या डिझेल वाहनांमध्ये उपलब्ध आहे, तर Ertiga आणि XL6 चे पेट्रोल प्रकार पॅडल शिफ्टर्ससह येतात.
टोयोटा हिलक्स
टोयोटा किर्लोस्कर मोटारने Hilux Lifestyle लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या मजबूत पिकअपची विक्री मार्च 2022 मध्ये सुरू होईल. टोयोटा हिलक्स फक्त डबल-कॅब प्रकारात सादर केली जाईल. या वाहनाचे स्पेअर पार्ट टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनरकडून घेतले आहेत. Hilux हे AIMV-2 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे आणि ते टोयोटा फॉर्च्युनरसारखे दिसते. टोयोटा हिलक्स फॉर्च्युनरच्या 2.8 लिटर चार-सिलिंडर डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे जे 201 Bhp पॉवर आणि 420 Nm पीक टॉर्क बनवते. SUV चे ऑटोमॅटिक व्हेरियंट 500 Nm पीक टॉर्क निर्माण करते. Hilux फक्त 4 बाय 4 आवृत्त्यांमध्ये उपलब्ध असेल आणि SUV ला ड्राइव्ह वैशिष्ट्ये देखील मिळतील. ज्यामध्ये हिल डिसेंट कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिट प्रोग्राम, लिमिटेड-स्लिप डिफरेंशियल आणि डिफरेंशियल लॉक यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
MG ZS EV
सध्या भारतीय बाजारपेठेतील काही इलेक्ट्रिक कारपैकी एक MG ZS EV आहे. चीनी मालकीची ब्रिटीश कार कंपनी MG लवकरच या इलेक्ट्रिक SUV चे 2022 मॉडेल देशात लाँच करणार आहे. ही कार फेब्रुवारीमध्ये लाँच होईल आणि सध्याच्या मॉडेलपेक्षा आधिक रेंजमध्ये येईल असे अपेक्षित आहे. कंपनी त्याच्या बाह्य आणि अंतर्गत डिझाइनमध्ये बदल करणार आहे. हे MG ZS EV चे फेसलिफ्ट मॉडेल असेल जे मोठ्या आकाराच्या आणि शक्तिशाली बॅटरीसह येईल.
कारवाल्यांसाठी महत्वाची बातमी : कार विमा हप्ता ‘असा’ होईल कमी; जाणून घ्या, काही सोप्या टिप्स