Upcoming SUVs : Toyota Fortuner साठी वाईट बातमी! टक्कर देण्यासाठी येत आहे ‘ह्या’ 3 शानदार एसयूव्ही कार्स

Upcoming SUVs : देशातील बाजारपेठेमध्ये गेल्या दिवसांपासून एसयूव्ही कार्सची मागणी झपाट्याने वाढली आहे. एसयूव्ही कार्समध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्स आणि जास्त स्पेस मिळत असल्याने या एसयूव्ही खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहे.

यातच आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय बाजारात उत्तम स्पेस, डॅशिंग लूक आणि जबरदस्त फीचर्समुळे टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्हीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आता या सेगमेंटमध्ये टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी तीन नवीन एसयूव्ही कार्स लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे टोयोटा फॉर्च्युनर खरेदी करणाऱ्यांसाठी हा लेख महत्वाचा ठरणार आहे. चला मग जाणून घेऊया कोणत्या कोणत्या एसयूव्ही कार्स भारतीय बाजारात लाँच होण्याची तयारी करत आहे.

I.N.D.i.A. आघाडीला धक्का! मायावतींची मोठी घोषणा; अनेक चर्चांना उधाण

 MG Gloster Facelift

काही रिपोर्टनुसार येत्या काही दिवसात भारतीय बाजारात MG मोठा धमाका करणार आहे. कंपनी लवकरच बाजारात फुल साइज एसयूव्ही MG Gloster Facelift लाँच करणार आहे. या वर्षाच्या मध्यात ही एसयूव्ही कार लाँच होण्याची शक्यता आहे. या कारमध्ये ग्राहकांना खूपकाही बदल पाहायला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टर्स हेडलॅम्प्स, पॅनोरामिक सनरूफ आणि ADAS लेव्हल 2 सोबत अनेक नवीन फीचर्स कंपनीकडून ऑफर करण्यात येणार आहे.

Mitsubishi Pajero

टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी भारतीय बाजारात लवकरच Mitsubishi Pajero देखील लाँच होणार आहे. होय, जपानी ऑटोमोबाईल कंपनी Mitsubishi पुन्हा एकदा भारतीय बाजारात एंट्री करणार आहे. यावेळी Mitsubishi Pajero मढेंहि कंपनी अनेक बदल करणार असल्याची माहिती आहे. याच बरोबर या कारमध्ये कंपनी ADAS लेव्हल 2 सारखे सेफ्टी फीचर्स देखील देणार असल्याचे बोलले जात आहे.

मालामाल करणारी योजना! मिळणार दुप्पट पैसे, मग विचार कसला ?

Ford Endeavour

Mitsubishi सह भारतीय बाजारात अमेरिकन कार कंपनी Ford देखील एंट्री करणार आहे. कंपनी भारतीय बाजारात एंट्री करत आपली Ford Endeavour एसयूव्ही कार लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी ओल्ड एन्डेव्हरला एव्हरेस्ट नावाने नवीन फीचर्स आणि लूकसह भारतीय बाजारात लाँच करण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे.

Leave a Comment