Upcoming Smartphone । 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह उद्या लाँच होतोय सर्वात स्वस्त फोन, फीचर्स जाणून व्हाल चकित

Upcoming Smartphone । नवीन स्मार्टफोन घेणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता सर्वात स्वस्त स्मार्टफोन खरेदी करू शकता. यामुळे तुमचे हजारो रुपये वाचतील, तसेच तुम्हाला उत्तम फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करता येईल.

बाजारात लवकरच Infinix Smart 8 Plus हा फोन लाँच होणार आहे. यात कंपनीने 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, 8GB RAM दिली आहे. ज्याची किंमत माहितीनुसार, 7000 रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

जाणून घ्या Infinix Smart 8 Plus ची भारतातील किंमत (लीक)

कंपनीने अजून स्मार्टफोनची किंमत जाहीर केली नाही, पण फ्लिपकार्टवरील मायक्रोसाइटने पुष्टी केली आहे की स्मार्टफोनची किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असणार आहे आणि फ्लिपकार्टवरून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

जाणून घ्या Infinix Smart 8 Plus चे फीचर्स

माहितीनुसार, Infinix Smart 8 Plus हे MediaTek Helio G36 SoC द्वारे समर्थित असून 4GB RAM आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. रॅम 8GB पर्यंत वाढवता येते तर स्टोरेज 2TB पर्यंत microSD कार्डद्वारे वाढवता येईल.

कंपनीने यामध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा IPS फुल-एचडी एलसीडी डिस्प्ले दिला आहे. फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50MP प्राथमिक सेन्सर आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन 18W जलद चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी पॅक करते. कंपनीच्या दाव्यानुसार, बॅटरीचा एक चार्ज 47 तासांचा टॉकटाइम, 90 तासांचा म्युझिक प्लेबॅक टाइम आणि 45 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक टाइम प्रदान करतो.

Leave a Comment