Upcoming Smartphone : नवीन स्मार्टफोन घ्यायचाय? मग, फक्त 4 दिवस थांबा; ‘हे’ दमदार फोन येताहेत

Upcoming Smartphone in 2024 : तुम्ही जर सध्या नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत (Upcoming Smartphone in 2024) असाल तर आणखी तीन ते चार दिवस थांबा. कारण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक चांगल्या दर्जाचे स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करताना आणखी काही दिवस वाट पाहणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. OnePlus Nord CE4 हा smartphone 1 एप्रिल रोजी बाजारात दाखल होत आहे. यानंतर Realme आणि Motorola या कंपन्यांचे दमदार स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत.

मार्च महिना आता जवळपास संपत आला आहे. या महिन्याचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. नवीन महिन्याची सुरुवात होताच एकामागून एक नवीन स्मार्टफोन्स बाजारात दाखल होणार आहेत. तुम्हालाही नवीन महिन्याच्या सुरुवातीला स्मार्टफोन खरेदी करायचे असल्यास ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

OnePlus Smartphone Offer : 108MP कॅमेरा असणारा 5G फोन 16499 रुपयात आणा घरी, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Upcoming Smartphone

OnePlus, Motorola आणि Realme या कंपन्यांचे नवीन स्मार्टफोन्स एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होणार आहेत. या मोबाईलमध्ये काय खास आहे, मोबाईलची किंमत काय आहे, तुम्हाला कोणती वैशिष्ट्ये या नवीन स्मार्टफोन्समध्ये मिळू शकतात, याची माहिती जाणून घेऊया..

OnePlus Nord CE4

हा स्मार्टफोन एक एप्रिल रोजी बाजारात लॉन्च होणार आहे. कंपनीने ॲमेझॉनवर या फोनचे लँडिंग पेज तयार केले आहे. या फोनमध्ये प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जनरल 3 अशी काही वैशिष्ट्ये आहेत. या स्मार्टफोनचा डिस्प्ले FHD+ असा आहे. रिझोल्युशन 120Hz रिफ्रेश रेट आहे. रॅम आणि स्टोरेज LPDDR4X 8GB रॅम, UFS 3.1 256 GB स्टोरेज आहे. हा फोन फक्त 15 मिनिटात चार्ज होऊ शकतो.

Realme 12x

हा स्मार्टफोन 2 एप्रिल रोजी बाजारात लॉन्च होणार आहे. फ्लिपकार्टवर कंपनीने या फोनसाठी लँडिंग पेज रिलीज केले आहे. या फोनमध्ये सुद्धा काही दमदार वैशिष्ट्ये कंपनीने दिली आहेत. त्यामुळे हा फोन ग्राहकांच्या पसंतीस पडू शकतो. या फोनमध्ये 5000mAH बॅटरी आहे. 45W जलद चार्जिंगही प्रदान करण्यात आले आहे.

Upcoming Smartphone

Motorola G04 : त्वरा करा! 7 हजारांपेक्षा स्वस्तात मिळतोय ‘हा’ फोन, सोडू नका अशी संधी

Motorola edge 50 pro

हा स्मार्टफोन 3 एप्रिल रोजी बाजारात लॉन्च होणार आहे. कंपनीने या फोनच्या जवळपास सर्व वैशिष्ट्यांची माहिती आधीच दिली आहे. फ्लिपकार्टवर या फोनचे लँडिंग पेज देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जनरल 3 आहे. या फोनचा डिस्प्ले 6.7 इंच आहे. तसेच 1.5 144Hz वक्र PHD डिस्प्ले आहे. 2000 nits पीक ब्राईटनेस, HDR 10+ सपोर्ट आणि कॉर्निंग ग्लास संरक्षण देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये 50MP रिअर कॅमेरा आहे. 13 MP अल्ट्रा – वाइड कॅमेरा आणि 13 MP मॅक्रो, 50MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 50W आणि 125w वायरलेस चार्जिंग सुविधा आहे.

Leave a Comment