Upcoming Maruti Car : मध्यमवर्गीय कुटुंब सेडान कारला पसंती देतात. मारुती सुझुकीची डिझायर ही या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त विक्री करणारी कार आहे. कंपनी आता या कारचे व्हर्जन आणणार असून यामुळे Tata चं टेन्शन वाढलं आहे.
Tata Curvv या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होणार असून कार आधी EV नंतर पेट्रोल आणि डिझेलमध्ये येईल. या दोन्ही कार सेडान सेगमेंटमध्ये एकमेकांशी स्पर्धा करतील.
मारुती डिझायर
मारुती डिझायर ही शक्तिशाली कार पेट्रोलवर 22.41 kmpl आणि CNG वर 31.12 km/kg मायलेज देते. कारमध्ये शक्तिशाली 1.2 लीटर इंजिन मिळेल. जे हाय स्पीडसाठी 82 एचपी पॉवर आणि 112 एनएम टॉर्क जनरेट करते. या शानदार कारचा टॉप स्पीड 177 किमी प्रतितास आहे, तर ही कार मोठ्या कुटुंबासाठी 378 लीटरच्या बूट स्पेससह येईल.
ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीत कंपनीच्या नवीन कारला 2 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. कारमध्ये तुम्हाला फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील मिळतील आणि ते LXi, VXi, ZXi आणि ZXi Plus या चार प्रकारांमध्ये दिले जाईल. डिझायरची फेसलिफ्ट आवृत्ती जुलै 2024 मध्ये लॉन्च होऊ शकते.
मारुती डिझायरची फीचर्स
- हाय पिकअपसाठी कारला 5 स्पीड गिअरबॉक्स मिळेल.
- कारमध्ये कीलेस एंट्री आणि 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल.
- कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन मिळेल.
- कारची प्रारंभिक किंमत ऑन-रोड 8.01 लाख रुपये इतकी आहे.
- कारमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि DRL मिळेल.
- तसेच या कारमध्ये 378 लीटरची मोठी बूट स्पेस आहे.
- कारमध्ये पुश स्टार्ट/स्टॉप बटण पाहायला मिळेल.
- या कारला रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि 15-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील मिळतील.
Tata Curvv
15 ऑगस्ट रोजी Tata आपली नवीन जनरेशन Tata Curvv लाँच करेल. कार आधी इलेक्ट्रिक नंतर पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये सादर करण्यात येईल. कारची किंमत 15 ते 20 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम असेल. तर सुरक्षेसाठी कारमध्ये ड्रायव्हर सहाय्यता प्रगत प्रणाली असणार आहे. ही प्रणाली सेन्सर्सवर कार्य करते. कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ पाहायला मिळेल, हे सनरूफ सामान्य छतापेक्षा आकाराने थोडे मोठे असेल.