Upcoming Kia EV : जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण बाजारात आता लवकरच Kia आपल्या ३ इलेक्ट्रिक SUV लाँच करणार आहे. या कार्सवर कंपनी अनेक दिवसांपासून काम करत होती.
Kia EV9 कार
Kia कडून EV9 फ्लॅगशिप इलेक्ट्रिक SUV म्हणून सादर करण्यात येईल. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कंपनीने जानेवारी 2023 मध्ये ऑटो एक्सपोमध्ये देखील प्रदर्शित केली आहे. माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर सुमारे 500 किलोमीटर चालवता येईल. इतकेच नाही तर तीन रो सीट्ससह आणता येईल. कंपनी ही ईव्ही भारतात तयार करण्याऐवजी आयात करते.
Kia EV3 कार
Kia ने नुकतेच EV3 जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आले आहे. ज्याची रचना EV9 वरून प्रेरणा घेऊन केली आहे. कंपनी जुलैमध्ये दक्षिण कोरियामध्ये ही SUV लाँच करणार आहे. यानंतर, या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरूवातीस ते युरोप आणि भारतीय बाजारात सादर केले जाईल.
Kia Clavis SUV कार
Kia EV सेगमेंटमध्ये Kia Clavis सादर करण्याच्या तयारीत असून सब फोर मीटर सेगमेंटची ही एसयूव्ही दक्षिण कोरिया तसेच भारतात चाचणीदरम्यान अनेकदा स्पॉट करण्यात आली आहे. माहितीनुसार, कंपनी याला इलेक्ट्रिक आणि ICE व्हर्जनमध्येही आणेल.
किआ कार
Kia ने बजेट MPV सेगमेंटमध्ये Carens ऑफर करण्यात आली आहे. कंपनी या MPV चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणणार आहे. अलीकडेच याचे फेसलिफ्ट व्हेरिएंट चाचणी दरम्यान दिसले आहे. अशी अपेक्षा आहे की त्याच्या ICE आवृत्तीच्या फेसलिफ्टसह, EV आवृत्ती भारतात सादर केली जाऊ शकते.