Upcoming IPO : सध्या आयपीओचा ( Upcoming IPO) बाजार तेजीत आहे. रोज नव्या कंपन्या आपले आयपीओ घेऊन बाजारात येत आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. लोक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयपीओ घेतात त्यामाध्यमातून कंपन्याही चांगले भांडवल गोळा करत आहेत. याआधी अनेक दिग्गज कंपन्यांनी आयपीओ आणले आणि त्यातून कोट्यावधींचे भांडवल गोळा केले. आताही काही कंपन्या आयपीओ आणण्याची तयारी करत आहेत. आता स्टेनलेस स्टील पाइप तयार करणारी कंपनी एयरोफ्लेक्स इंडस्ट्रिज लिमिटेड (Aeroflex Industries) या कंपनीचा आयपीओ येत्या 22 ऑगस्ट रोजी खुला होणार आहे.
- Israel Hamas War : युद्धविराम संपताच इस्त्रायलचा ‘एअरस्ट्राइक’; पहा, युद्धात काय घडलं?
- Healthy Diet Tips : पोटाची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ टिप्स फॉलो करा; 7 दिवसांत फरक नक्कीच!
- Vitamin E for Hair Care : केस गळती वाढली? नो टेन्शन, खोबरेल तेलात मिसळा ‘ही’ वस्तू; केस होतील घनदाट
- Exercise for Sharper Memory : काय, तुमचाही विसराळूपणा वाढलाय? मग, ‘या’ 5 ट्रिक ट्राय कराच
- Rinku Singh : रिंकूचा धमाका, रसेल-पोलार्डलाही पछाडले; पहा, काय केला कारनामा
या आयपीओसाठी गुंतवणूकदार 24 ऑगस्टपर्यंत बोली लावू शकतात. कंपनीच्या आरएचपी नुसार हा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी एक दिवस आधी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी खुला होईल. पीटीआय वृत्तसंस्थेने मर्चेंट बँकिंग सोर्सच्या हवाल्याने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की हा आयपीओ 350 कोटींचा असू शकतो.
मुंबईस्थित ही कंपनी मॅटेलिक फ्लेक्सीबल फ्लो सॉल्युशन्स उत्पादने तयार करते. कंपनी भारतासह 80 पेक्षा जास्त देशात विस्तारलेली आहे. यामध्ये युरोप, अमेरिकेचाही समावेश आहे. या प्रगत देशांतही कंपनीचे अस्तित्व आहे. कंपनीच्या उत्पन्नातील 80 टक्के हिस्सा हा निर्यातीतून येतो. 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न जवळपास 240 कोटी रुपये इतके होते. या दरम्यान कंपनीला 27.5 कोटी रुपये नफा झाला. कंपनीचा आयपीओ एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) आणि बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) वर होईल.
शेअर बाजारात सध्या आयपीओ तेजीत आहे. गुंतवणूकदारांसाठी हा गुंतवणुकीचा एका नवा मार्ग खुला झाला आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी त्यांचे आयपीओ आणले आहेत. आताही बऱ्याच कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आयपीओच्या माध्यमातून चांगले उत्पन्न आणि गुंतवणुकीची संधी मिळणार आहे.
गुंतवणूक करताय मग, ‘या’ गोष्टीही विसरू नका
आयपीओमध्ये गुंतवणूक (Investment) करणार असलात तरी आधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचेच आहे. आधी आपला शेअर बाजाराचा अभ्यास पक्का करा. शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची माहिती घेऊन पूर्तता करा. ज्या कंपनीचा आयपीओ किंवा शेअर तुम्ही घेणार आहात त्याची योग्य माहिती घ्या. कंपनीचा इतिहास आणि कामगिरी तपासा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यानंतर आणखी आवश्यक माहिती आणि तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरे मिळवा. त्यानंतर गुंतवणूक केल्यास ते तुमच्यासाठी फायद्याचेच राहिल.