मुंबई – सध्या राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) रोजच नवनवीन घडामोडी घडत आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या बंडखोरीने महाविकास आघाडी सरकार पडले. त्यामुळे आता नवीन सरकार सत्तेत आले आहे. विरोधी पक्षातीलही वाद समोर येत आहेत. आताही अशीच एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election) काँग्रेसच्या (Congress) पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराला मतदान न करणाऱ्या आणि विश्वासमताच्या वेळी गैरहजर राहिलेल्या आमदारांविरुद्ध कारवाईचे संकेत काँग्रेसच्या वरिष्ठांनी दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यासंदर्भात एक अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला आहे.
Shiv Sena: शिवसेनेवर कोणाचा हक्क? शिंदे गट ‘त्या’ निर्णयावर ठाम; समजून घ्या संपूर्ण गणित https://t.co/bsTacwfWpi
— Krushirang (@krushirang) July 6, 2022
मागील 20 जून रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला होता. हंडोरे यांना पहिल्या पसंतीची मते मिळाली नाहीत म्हणून त्यांचा पराभव झाला. यासाठी काँग्रेसमधीलच काही आमदारांनी क्रॉस व्होट दिल्याचे पटोले यांनी या अहवालात मान्य केल्याचे दिसते. विश्वास ठरावाच्या वेळी गैरहजर राहिलेल्या आमदारांच्या हेतूंवर संशय व्यक्त करण्यात आला. क्रॉस व्होटिंग करणारे व विश्वासमताच्या वेळी गैरहजर राहिलेले सात सदस्य कॉमन असल्याचेही पटोले यांनी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले आहे.
Eknath Shinde: दाऊद प्रकरणात एकनाथ शिंदेंचा मोठा आरोप; म्हणाले,राष्ट्रवादीमुळे.. https://t.co/vAHTxRNqiV
— Krushirang (@krushirang) July 6, 2022
आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, असे पटोले यांनी सांगितले. काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढाव्यात, असे पटोले यांनी आधीही सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन वादही निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. मात्र, पटोले आजही स्वबळाचा दावा करत आहेत. सध्या राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. या बदललेल्या परिस्थितीनुसार रणनितीत बदल करण्याचे पक्षाने ठरवल्याचे दिसत आहे.