Upcoming Bikes : भारतात लॉन्च होणार ‘या’ शक्तिशाली बाईक्स, पहा लिस्ट आणि फीचर्स

Upcoming Bikes : भारतीय बाजारात आता अनेक मोठ्या कंपन्या आपल्या शानदार फीचर्स असणाऱ्या बाईक्स लाँच करणार आहे. या बाईक्समध्ये तुम्हाला शानदार फीचर्स पाहायला मिळतील. जाणून घ्या फीचर्स आणि लिस्ट.

TVS Raider 125 फ्लेक्स-फ्युएल

भारतीय बाजारात लवकरच TVS कंपनी आपली 125cc इंजिन असलेली बाइक Raider फ्लेक्स इंधनासह लॉन्च करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन मॉडेल या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च करण्यात येईल. किमतीचा विचार केला तर या बाइकची अपेक्षित किंमत सुमारे 1.10 लाख रुपये असेल. या बाइकमध्ये 125cc इंजिन असेल जे 11.2hp पॉवर आणि 11.2Nm टॉर्क देण्यात येईल. येत्या काळात फ्लेक्स-इंधन बाइक्स लाँच केल्या जाणार आहेत, कारण त्या इको-फ्रेंडली आहेत.

Guerrilla 450

Royal Enfield ही बाईक हिमालयन 450 च्या प्लॅटफॉर्मवर तयार केली असून चाचणी दरम्यान ही बाईक अनेक वेळा पाहिली आहे. या बाइकमध्ये सिंगल सीट कॉन्फिगरेशन आढळेल. कंपनीची ही बाईक रोडस्टर स्टाईलमध्ये आणली जाईल.

सुझुकी ऍक्सेस 125 फेसलिफ्ट

सुझुकी या महिन्यात आपली नवीन Access 125 स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत असून ही स्कूटर पूर्णपणे बदलणार आहे. नवीन मॉडेल चाचणी दरम्यान अनेक वेळा स्पॉट करण्यात आले आहे. माहितीनुसार यावेळी सुझुकी अधिक तरुणांना लक्ष्य करेल. फेसलिफ्टेड सुझुकी ऍक्सेस सध्याच्या 125cc इंजिनद्वारे समर्थित असून ती 8.7 PS पॉवर आणि 10 Nm टॉर्क निर्माण करेल.

हे इंजिन CVT गिअरबॉक्सने सुसज्ज असणार आहे. फेसलिफ्ट Suzuki Access 125 मध्ये एक नवीन डिझाइन पाहायला मिळेल. त्यात काही चांगल्या फिचर्सचा समावेश केला जाईल. इतकेच नाही तर आरामावरही पूर्ण लक्ष देण्यात येईल. याला नवीन बॉडी पॅनलसह ताजेतवाने लुक मिळेल. यात नवीन हेडलाईटसोबतच नवीन टेललाइटही पाहायला मिळेल. यात 10 इंच चाके, ग्रॅब रेल, फ्रंट स्टोरेज, लांब आणि रुंद सीट असतील.

रॉयल एनफिल्ड

हेवी इंजिन असणारी बाईक खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर Royal Enfield पुढील काही महिन्यांत 5 नवीन मॉडेल्स लॉन्च करेल. कंपनी नवीन बाइक्सच्या माध्यमातून तरुणांना टार्गेट करेल. लवकरच तुम्हाला नवीन बुलेट 650 पाहायला मिळेल. ती एका दमदार बाईकच्या रूपात पाहायला मिळेल आणि त्यात अनेक उत्तमोत्तम फीचर्सही पाहायला मिळतील. माहितीनुसार नवीन बाइकमध्ये 350 सीसी इंजिन मिळेल जे 47 bhp पॉवर आणि 52 Nm टॉर्क जनरेट करेल. यात 5 स्पीड गिअरबॉक्स आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिमची सुविधा असणार आहे.

Classic 350 Bobber

Royal Enfield चे नवीन Bobber Classic 350 लवकरच लॉन्च होईल. बाईकमध्ये 350 सीसी इंजिन मिळेल. जे 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करेल. यात 5 स्पीड गिअरबॉक्स आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम सुविधा असेल. बाईकचा लुक क्लासिक स्टाइलमध्ये असेल.

Leave a Comment