मुंबई : उत्तर प्रदेशात विधानपरिषद म्हणजेच एमएलसी निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीचा निकाल 12 एप्रिलला लागणार आहे. मात्र, निवडणुकीत भाजप भक्कम मानला जात आहे. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या नावावर नवा विक्रम नोंदवला जाणार आहे. विधानपरिषदेत भाजप पूर्ण बहुमताच्या अगदी जवळ पोहोचला आहे. असे घडल्यास, 40 वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला सभागृहात पूर्ण बहुमत मिळेल. याआधी 1982 मध्ये काँग्रेसकडे पूर्ण बहुमत होते.
100 सदस्यीय उत्तर प्रदेश विधान परिषदेत बहुमताचा आकडा 51 आहे. सध्या भाजपचे 34 आमदार आहेत. त्याचबरोबर समाजवादी पक्षाच्या खात्यात 17 सदस्य आहेत. दुसरीकडे बसपा चार, काँग्रेसचे एक, अपना दलाचे एक सदस्य आहेत. याशिवाय दोन शिक्षक एमएलसी, दोन अपक्ष आणि एक निषाद पक्षाचा सदस्य आहे. 37 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 36 जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र, नऊ जागा बिनविरोध जिंकल्यानंतर भाजपकडे 43 आमदार आहेत. उर्वरित 27 जागांसाठी शनिवारी मतदान झाले. त्यातही भाजपला 22 ते 25 जागा मिळू शकतात. असे घडल्यास भारतीय जनता पार्टीच्या सदनातील सदस्यांची संख्या 64 वरून 66 होईल. बहुमताच्या आकड्यापेक्षा कितीतरी जास्त.
मुरादाबाद-बिजनौर, रामपूर-बरेली, पिलीभीत-शाहजहांपूर, सीतापूर, लखनौ-उन्नाव, रायबरेली, प्रतापगढ, सुलतानपूर, बाराबंकी, बहराइच, आझमगढ-मऊ, गाझीपूर, जौनपूर, वाराणसी, झांसी-कानशिलपुर , इटावा-फर्रुखाबाद, आग्रा-फिरोजाबाद, मेरठ-गाझियाबाद, मुझफ्फरनगर-सहारनपूर, गोंडा, फैजाबाद, बस्ती-सिद्धार्थनगर, गोरखपूर-महाराजगंज, देवरिया आणि बलिया या जागांसाठी आता मतदान झाले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले आहे. यावेळी सत्ताधारी पार्टीच्या काही जागा कमी झाल्या आहेत. मात्र, सलग दुसऱ्या वेळेस सत्ता मिळवण्यात पक्षाला यश मिळाले आहे. समाजवादी पार्टी दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
मंत्र्यांना आणखी एक झटका..! उत्तर प्रदेशच्या नव्या सरकारने घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या..