दिल्ली : भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Separation) वेगळे होऊन आता 75 वर्षे झाली आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, स्वातंत्र्याच्या वेळी देश सोडून पाकिस्तानात गेलेल्या लोकांची भूमी अजूनही भारतात (Lands of Pakistani Citizens in India) आहे. इतकंच नाही तर इथल्या जमिनीच्या खतौनीमध्ये पाकिस्तानींची नावंही नोंदवली जातात. त्याचप्रमाणे देशाचं नावही पाकिस्तान असं लिहिलं जातं. तुम्ही विचार करत असाल की हे कसे शक्य आहे? आता अधिकारी या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

झी न्यूज (Zee News) यांनी मिळालेल्या माहितीनुसार बातमीत म्हटले आहे की, हे प्रकरण कानपूर ग्रामीण भागातील अकबरपूर तहसीलमधील बारा गावचे आहे. या गावातील जमिनीच्या नोंदींमध्ये अनेक पाकिस्तानी लोकांची नावे आहेत. डीएमच्या आदेशानुसार आता तहसील प्रशासन पाकिस्तानींच्या नावावर नोंदवलेल्या जमिनींचा तपशील तयार करत आहे. यानंतर शत्रू मालमत्तेअंतर्गत कारवाई केली जाईल. स्वातंत्र्यानंतर देशाच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा येथील लोक तेथे राहायला गेले. त्यांच्या जमिनी आजही येथे आहेत. या जमिनी अनेक वर्षे रिकाम्या राहिल्या, मात्र लोकसंख्या वाढल्याने काही लोकांनी त्यावर कब्जा करण्यास सुरुवात केली. ज्यांच्या नावावर या जमिनी आहेत ते लोक हयात आहेत की नाही, याचीही माहिती नाही. जमिनीच्या प्रकरणात आजपर्यंत कोणाचीही तक्रार नाही. यावर कानपूर जिल्हा दंडाधिकारी नेहा जैन यांनी सांगितले की, अशा प्रकरणाची कोणतीही माहिती नाही. अशा जमिनींची पाहणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. या जमिनींची तपासणी केल्यानंतर त्याची माहितीही शासनस्तरावर दिली जाणार आहे. आता शत्रू मालमत्ता नियमानुसार कारवाई केली जाईल.

Share.

Leave A Reply

Exit mobile version