Unnao Accident: भीषण अपघात, बस दुधाच्या कंटेनरला धडकली; 18 जणांचा मृत्यू

Unnao Accident : लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर (Lucknow-Agra Expressway) आज सकाळी ( 10 जुलै) भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील (Unnao Accident) लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर आज सकाळी डबल डेकर बस दुधाच्या कंटेनरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात जागीच 18 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहे.

आतापर्यंत जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बेहता मुजावर पोलीस स्टेशन परिसरात सकाळी हा अपघात झाला. घटनेनंतर सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरु आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. ज्यामध्ये उन्नावचे पोलीस अधीक्षक, क्षेत्र अधिकारी बांगरमाऊ उपस्थित होते. अपघात झालेल्या बसचा क्रमांक UP95 T 4720 असून दुधाच्या कंटेनरचा क्रमांक UP70 CT 3999 आहे. मृत्युमुखी पडलेल्या 18 जणांपैकी 14 जणांची ओळख पटली आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची माहिती

मेरठचा दिलशाद, शिवहरचा रजनीश, शिवहरचा लालबाबू दास, रामप्रवेश कुमार, भारतभूषण कुमार, बाबू दास, मोहम्मद सद्दाम, नगमा, शबाना, चांदनी, मोहम्मद शफीक, मुन्नी खातून तौफिक आलम तर मृत्युमुखी पडलेल्या चार प्रवाशांची ओळख पटलेली नाही.

Leave a Comment