Nitin Gadkari : नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कारमधील 6 एअरबॅग्जबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादक कंपन्यांवर आश्चर्य व्यक्त करताना सांगितले की, भारतीय बाजारपेठेतील कंपन्या सर्व कारमध्ये 6 एअरबॅग का देत नाहीत ? परदेशी बाजारपेठेत असे होत नाही. लहान स्वस्त कार वापरणाऱ्या लोकांच्या सुरक्षेचा विचार ऑटो कंपन्यांनीही करायला हवा, असे ते म्हणाले होते. गडकरी म्हणाले होते की, दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघातांमध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो आणि 3 लाख लोक जखमी होतात.

या दरम्यान केंद्रीय मंत्री म्हणाले होते की, ऑटो उत्पादक आपल्या देशातील स्वस्त कार वापरणाऱ्या लोकांच्या जीवनाचा विचार का करत नाहीत ? गडकरींच्या या वक्तव्यानंतर वाहन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोणतेही वक्तव्य आलेले नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार आता ऑटो कंपन्यांमध्ये 6 एअरबॅगच्या (Airbag) पर्यायाबाबत बैठका सुरू झाल्या आहेत.

काही काळापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कारमध्ये एअरबॅग अनिवार्य करण्याबाबत विधान केले होते. त्यानंतर प्रत्येक कारमध्ये मानक वैशिष्ट्ये म्हणून ABS आणि दोन फ्रंट एअरबॅग प्रदान करण्याचा नियम बनला. आता पुन्हा एकदा नितीन गडकरींनी 6 एअरबॅग्जबाबत वक्तव्य केलं आहे. आता असे मानले जात आहे, की असा नियम लवकरच येऊ शकतो, त्यानंतर मानक वैशिष्ट्य म्हणून सर्व वाहनांमध्ये 6 एअरबॅग्ज अनिवार्य होतील.

जर कारमध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग्ज असतील तर अपघातातील मृतांच्या संख्येत मोठी घट होईल. 6 एअरबॅगच्या बाबतीत वाहनांच्या किमती वाढू शकतात, परंतु सरकार त्याचे नियमन करू शकते. 6 एअरबॅग्स बसवण्यासाठी कंपन्यांना वाहनांची रचना देखील बदलावी लागू शकते, कारण लहान वाहने 6 एअरबॅगसाठी डिझाइन केली जाऊ शकत नाहीत. 6 एअरबॅग झाल्यास, कंपन्यांना कॉस्ट कट करणे भाग पडेल आणि अशा परिस्थितीत वाहनांच्या गुणवत्तेत फरक पडू शकतो. हा नियम लागू झाल्यास वाहन कंपन्यांच्या मार्जिनमध्ये मोठी घट होणार आहे.

 

Share.

Leave A Reply

Exit mobile version