Union Cabinet : शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने (Union Cabinet) अनेक पिकांवर एमएसपी (MSP) वाढवली आहे. ही वाढ 2023-24 या आर्थिक वर्षातील खरीप पिकांसाठी करण्यात आली आहे. मोदी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार तूर डाळीच्या एमएसपीमध्ये (हमीभाव) प्रति क्विंटल 400 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर धान, मका आणि भुईमूगाच्या एमएसपीमध्येही वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून त्यांना नवीन पिकाला चांगला भाव मिळू शकेल. शेतीचा वाढता खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कोणत्या पिकाचा MSP किती वाढला?
मंत्रिमंडळाने 2023-24 साठी उडीद डाळीचा एमएसपी प्रति क्विंटल 350 रुपयांनी वाढवून 6,950 रुपये प्रति क्विंटल केला आहे. त्याचबरोबर मक्याचा एमएसपी 128 रुपये प्रति क्विंटल आणि धानाचा एमएसपी 143 रुपये प्रति क्विंटलने वाढवून 2,183 रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- Onion Curry : कांद्याची टेस्टी भाजी कधी खाल्ली का? मग, ‘या’ रेसिपीने एकदा तरी ट्राय कराच
- घरीच तयार करा गरमागरम Vegetable Pasta; रेसिपीही आहे एकदम सोपी
- LIC Schemes : एकाच वेळेस करा पैसे जमा, होईल पेन्शनची सोय; LIC ची ‘ही’ स्कीम खासच
- Car Buying Tips : सेकंड हँड कार खरेदी करताय ? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
- हृदयविकाराचा धोका वाढवतो High Cholesterol; कंट्रोल करण्यसाठी ‘हे’ फूड खाणे टाळाच
मोदी मंत्रिमंडळाकडून मूगाच्या एमएसपीमध्ये कमाल 803 रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे आणि मूगवरील एमएसपी 8,558 रुपये प्रति क्विंटलवर गेला आहे.
एमएसपीमध्ये यंदा सर्वाधिक वाढ झाली आहे
मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, कृषी क्षेत्रात आम्ही वेळोवेळी CACP (कृषी खर्च आणि किंमती आयोग) च्या शिफारशींच्या आधारे एमएसपी निश्चित करत आहोत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा खरीप पिकांसाठी एमएसपीमध्ये झालेली वाढ सर्वाधिक आहे.
मान्सून सामान्य राहील
एल निनोचा प्रभाव असला तरी जून ते सप्टेंबर दरम्यान वातावरण सामान्य राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. मात्र, एक जूनला मान्सून केरळमध्ये वेळेवर पोहोचला नाही.