Unhealthy Foods | सावधान..! ज्या पदार्थांना समजताय हेल्दी तेच पाडतील आजारी; वाचा अन् सावध व्हा

Unhealthy Foods : हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लोक अनेक हेल्दी फूड्स त्यांच्या (Unhealthy Foods) डायटमध्ये समाविष्ट करतात. तथापि लोक जे पदार्थ निरोगी मानतात आणि त्यांना त्यांच्या आहाराचा भाग बनवतात ते खरोखर आरोग्यास हानी पोहोचविणारे ठरू शकतात. चला तर मग अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊ या जे हेल्दी वाटत असले तरी प्रत्यक्षात आरोग्यदायी नसतात..

भेसळीच्या आजच्या युगात प्रत्येक जण निरोगी राहण्यासाठी आरोग्यदायी पर्यायांच्या शोधात असतो. आजकाल लोक आपल्या आरोग्याबाबत जास्त जागरूक आणि सतर्क झाले आहेत. अशा परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी लोक अशा अनेक खाद्यपदार्थांना त्यांच्या आहाराचा भाग बनवतात ज्यामुळे त्यांना निरोगी राहण्यास मदत होईल. निरोगी राहण्यासाठी लोक अनेक पदार्थांना निरोगी मानतात आणि या पदार्थांचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करतात. परंतु जर तुम्हाला असे सांगितले गेले की तुम्ही ज्या पदार्थांना निरोगी मानत आहात ते खरोखरच तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात तर तुमचा विश्वास बसेल का..

Health Tips : लघवीच्या रंगावरून समजेल तुमचे आरोग्य, अशी लक्षणे दिसल्यास घ्या डॉक्टरांचा सल्ला

Unhealthy Foods

नाही बसणार ना.. पण काही गोष्टी तुमच्या विचारांच्या अगदी विरुद्ध असतात. आज या लेखात आम्ही अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल आणि त्यांच्या हानिकारक प्रभावांबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही आरोग्यदायी मानून भरपूर प्रमाणात खात असता.

ब्रेकफास्ट सिरीयल

आरोग्यदायी अनेक फायदे असूनही ब्रेकफास्ट सिरीयल तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. वास्तविक त्यात अतिरिक्त साखर, आर्टिफिशियल टेस्ट असतात आणि या खाद्यपदार्थात फायबरचा अभाव असतो. त्यामुळे आरोग्यास हानिकारक ठरू शकतात.

ब्राऊन ब्रेड

आजकाल लोक सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्राऊन ब्रेड जरा जास्तच प्रमाणात खात आहेत. नेहमीच्या उपलब्ध असणाऱ्या पांढऱ्या ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड अधिक आरोग्यदायी आहे असे समजले जाते. परंतु हे अगदी विपरीत आहे. फायबर सामग्री असूनही ब्राऊन ब्रेडमध्ये काही रिफाइंड पीठ आणि अतिरिक्त साखर असू शकते. ज्यामुळे त्यांचे पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते.

Unhealthy Foods

Health tips : सावधान! तुम्ही अशुद्ध मध तर नाही ना खात? वेळीच जाणून घ्या

फ्रूट ज्यूस

आजारी असल्यास किंवा दैनंदिन आहाराचा भाग म्हणून बऱ्याचदा फळांचा रस घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु यामध्ये एक गोष्ट अशी असते जी सहसा कोणाच्याही लक्षात येत नाही. फळांच्या रसामध्ये फायबरची कमतरता असते आणि त्यात अनेकदा साखरेचा समावेश केला जातो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. त्यामुळे असे फ्रुट ज्यूस पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात त्यामुळे फ्रुट ज्यूस पिण्याऐवजी तुम्ही फळे खाल्ली तर ते जास्त उपयुक्त ठरू शकेल.

डायजेस्टिव्ह बिस्कीट

डायजेस्टिव्ह बिस्किटाच्या नावावर ते आरोग्यदायी असतील असे तुम्हाला वाटू शकते परंतु परिस्थिती अगदी याच्या विपरीत आहे. या बिस्किटांमध्ये उच्च साखरेचे प्रमाण आणि अनहेल्दी फॅट तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

Leave a Comment