Under 19 World Cup : ICC ने मोठा निर्णय घेत 19 वर्षांखालील विश्वचषक श्रीलंकेऐवजी दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्याचा (Under 19 World Cup) निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाला निलंबित केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) हे पाऊल उचलले आहे. सरकारच्या हस्तक्षेपामुळे ICC ने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला तत्काळ प्रभावाने निलंबित केले होते.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. क्रिकेट बोर्डाला निलंबित केल्यानंतर आयसीसीने आता अंडर-19 वर्ल्डकपचे यजमानपद हिसकावून घेतले आहे. अंडर-19 विश्वचषक आता श्रीलंकेऐवजी दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. अंडर-19 विश्वचषक 14 जानेवारीपासून सुरू होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 15 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.
श्रीलंकेकडून यजमानपद हिसकावले
ICC ने मोठा निर्णय घेत 19 वर्षांखालील विश्वचषक श्रीलंकेऐवजी (Sri Lanka) दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाला निलंबित केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हे पाऊल उचलले आहे. सरकारच्या हस्तक्षेपामुळे ICC ने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला तत्काळ प्रभावाने निलंबित केले होते.
श्रीलंका स्पर्धेत भाग घेऊ शकेल
श्रीलंकेचा क्रिकेट संघ अंडर-19 विश्वचषकात सहभागी होऊ शकणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. श्रीलंका इतर संघांप्रमाणेच या स्पर्धेत खेळेल याला खुद्द आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दुजोरा दिला आहे. विश्वचषकाचे यजमानपद गमावणे हा श्रीलंका क्रिकेट बोर्डासाठी निश्चितच मोठा धक्का आहे.
स्पर्धा कधी सुरू होईल
अंडर-19 विश्वचषक 14 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा आता दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली जाणार आहे. अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. म्हणजेच महिनाभराच्या लढाईनंतर अंडर-19 चॅम्पियन संघाचा निर्णय होणार आहे.
तथापि ही स्पर्धा 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणार्या दक्षिण आफ्रिका टी-20 लीगच्या तारखांशी भिडणार आहे. असे असूनही दोन्ही स्पर्धांचे चांगले आयोजन करण्यात बोर्ड यशस्वी होईल असे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे.