Take a fresh look at your lifestyle.

China Taiwan Tension : आता चीननेही केला अमेरिकेवर पलटवार; ‘या’ पद्धतीने दिले अमेरिकेला उत्तर

China Taiwan Tension : अमेरिकी सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांच्या तैवान दौऱ्यामुळे चीन हादरला आहे. चीनने शुक्रवारी सांगितले की त्यांनी अमेरिकेसोबतच्या अनेक संरक्षण बैठका रद्द केल्या आहेत. अगदी अमेरिकेसोबतच्या (America) प्रमुख हवामान चर्चाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात पेलोसी यांच्या तैवान भेटीला चिथावणीखोर कृत्य म्हटले आहे. हे पाऊल चीनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या विरोधात असल्याचे त्यात म्हटले आहे.

Advertisement

Advertisement

पेलोसीच्या तैवान भेटीला उत्तर म्हणून, चीनने (China) अमेरिकेशी हवामान बदल, लष्करी समस्या आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाईवर चर्चा थांबवली आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. चीन आणि अमेरिका जगातील दोन सर्वात मोठे कार्बन उत्सर्जन करणारे देश आहेत. गेल्या वर्षी ग्लासगो येथे COP26 शिखर परिषदेत हवामान करारावर स्वाक्षरी केली. या दशकात, त्यांनी जलद कृती करण्याचे आणि हवामान बदलासाठी एकत्र काम करण्याचे वचन दिले.

Advertisement

चीन स्वशासित आणि लोकशाही तैवानला अविभाज्य भूभाग मानतो. पेलोसीच्या तैवान (Taiwan) भेटीनंतर चीनने बॉम्बफेक आणि लष्करी सरावाच्या धमक्या दिल्या. नौदलाची जहाजे आणि युद्ध विमाने या बेटावर पाठवण्यात आली असून त्यांनी तेथे क्षेपणास्त्रे डागली आहेत. तैवानकडून लष्करी प्रत्युत्तर मिळालेले नसले तरी राष्ट्रपतींचे एक विधान समोर आले आहे. राष्ट्रपती म्हणाले की, चीन तैवानच्या परिसरात लष्करी कवायती करत आहे. अशा वेळी आता बीजिंगला संयमाने वागण्याचे आवाहन करत आहोत. आम्ही आमच्या सार्वभौमत्वाचे, आमच्या लोकशाहीचे रक्षण करणार आहोत.

Advertisement

याआधी गुरुवारी जी-7 देशांच्या वक्तव्याचा निषेध करत चीनने जपानबरोबरची (Japan) परराष्ट्र मंत्र्यांची बैठक रद्द केली. G-7 ने एका निवेदनात म्हटले होते की, चीनच्या लष्करी सरावाचे कोणतेही समर्थन नाही. चीनने याआधी अमेरिकेचे राजदूत निकोलस बर्न्स यांना बोलावून पेलोसी यांच्या भेटीचा निषेध केला होता.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply