Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Asia Cup 2022 : भारतीय संघासाठी खुशखबर; ‘या’ दोन खेळाडूंचे पुनरागमन निश्चित; जाणून घ्या..

Asia Cup 2022 : सलामीवीर आणि उपकर्णधार म्हणून पहिली पसंती असलेला लोकेश राहुल (Lokesh Rahul) 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आशिया कपसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज दीपक चहरसह (Dipak Chahar) पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. आशिया कप 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत दुबई आणि शारजाह येथे टी-20 फॉरमॅटमध्ये होणार आहे. राहुलने झिम्बाब्वे (Zimbabwe) विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात पुनरागमन करणे अपेक्षित होते, परंतु, आजारपणामुळे तसे घडले नाही. चेतन शर्माच्या (Chetan Sharma) नेतृत्वाखालील निवड समिती 15 खेळाडूंची निवड करते की सर्व संभाव्य पर्याय लक्षात घेऊन 17 जणांचा संघ निवडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

Advertisement

आशिया चषकाचा भारतीय संघ टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची रचना काय असेल याची चांगली कल्पना देईल. मेलबर्न क्रिकेट मैदानावर 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध पहिल्या T20 विश्वचषक सामन्याआधी भारताला जवळपास डझनभर सामने खेळायचे आहेत. गेल्या सहा टी-20 सामन्यांमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे रोहित शर्माचे (Rohit Sharma) सलामीचे भागीदार आहेत. संघात परतल्यावर राहुलला पुन्हा एकदा टॉप ऑर्डरमध्ये जागा मिळेल.

Loading...
Advertisement

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका सूत्राने सांगितले की, “लोकेश राहुलला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. जेव्हा तो टी-20 खेळतो तेव्हा तो नेहमीच स्पेशालिस्ट सलामीवीर म्हणून खेळतो. भविष्यात सूर्यकुमार आणि ऋषभ हे मधल्या फळीतील विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळतील. आयपीएलमध्ये अनेक धावा करणाऱ्या राहुलवर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये डावाची सुरुवात करताना त्याच्या संथ फलंदाजीबद्दल टीका होत आहे. अशा स्थितीत यूएईमध्ये होणाऱ्या स्पर्धेत राहुलला आपल्या खेळात नक्कीच बदल करावा लागणार आहे. विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म हा भारतीय संघासाठी सर्वात मोठा काळजीचा मुद्दा असला तरी या स्टार फलंदाजाच्या तिसऱ्या क्रमांकाला सध्या तरी कोणताही धोका दिसत नाही.

Advertisement

संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्रा सिंह चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार

Advertisement
Advertisement

Leave a Reply