Corona : देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देशात 20 हजार 551 नवीन रुग्ण (Corona virus Patient) आढळले आहेत. आतापर्यंत संपूर्ण देशात कोरोनामुळे एकूण 5,26,600 मृत्यू झाले आहेत. त्यात गेल्या 24 तासांतील मृतांचीही नोंद आहे. दरम्यान, दैनिक साप्ताहिक प्रकरणांचा दर 5.14 वर पोहोचला आहे.
देशात अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 1,35,364 आहे. अॅक्टिव्ह प्रकरणांचा दर 0.31 टक्के आहे. सध्याचा रिकव्हरी दर (Recovery Rate) 98.50 टक्के आहे. गेल्या 24 तासात 21 हजार 595 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 4,34,45,624 आहे. दैनंदिन अॅक्टिव्ह प्रकरणांचा दर 5.14 टक्के आहे. साप्ताहिक अॅक्टिव्ह प्रकरणांचा दर 4.64 टक्के आहे. आतापर्यंत 87.71 कोटी कोरोना तपासणी झाली आहे. गेल्या 24 तासांत 4,00,110 तपासण्या (Covid 19 Test) करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 205.59 कोटी (93.46 कोटी द्वितीय डोस आणि 10.09 कोटी खबरदारी डोस) लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 36,95,835 लसी (Vaccine) देण्यात आल्या.
शेवटच्या अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत देशातील कोविड-19 लसीकरण (Vaccination) कव्हरेज 205.59 कोटी (2,05,59,47,243) आहे. 2,72,54,426 लसीकरण सत्रांद्वारे हे यश प्राप्त झाले आहे. 12-14 वयोगटासाठी कोविड-19 लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू झाले. आतापर्यंत, 3.93 कोटींहून अधिक (3,93,33,326) किशोरांना कोविड-19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 18-59 वयोगटातील सावधगिरीचा डोस देखील 10 एप्रिल 2022 रोजी सुरू करण्यात आला.
परिणामी, देशातील रिकव्हरी दर 98.50 टक्के आहे. गेल्या 24 तासात 21,595 रुग्ण बरे झाल्याने, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,34,45,624 वर पोहोचली आहे. देशात आज 1,35,364 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. एकूण पॉझिटिव्ह प्रकरणांपैकी 0.31 टक्के अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासात एकूण 4,00,110 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशाने आतापर्यंत एकूण 87.71 कोटी तपासण्या केल्या आहेत.