Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IND vs WI : वेस्टइंडिज संघाला दुहेरी झटका.. सामना तर गमावलाच पण पैशांचाही बसला झटका; जाणून घ्या..

Please wait..

IND vs WI : ICC ने भारताविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी वेस्ट इंडिज (West Indies) संघावर कारवाई केली आहे. स्लो ओव्हर रेटने (Slow Over Rate) गोलंदाजी केली म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. पहिल्या T20I सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी निर्धारित वेळेत गोलंदाजी पूर्ण केली नाही. यामुळे आयसीसीने (ICC) आचारसंहितेनुसार कॅरेबियन संघाला मॅच शुल्काच्या 20 टक्के दंड ठोठावला आहे. कॅप्टन निकोलस पूरनने (Nicholas Pooran) ही गोष्ट स्वीकारली आहे. मैदानावरील अंपायर लेस्ली रेफर आणि निगेल डुगुइड, ग्रेगरी ब्रॅथवेट आणि पॅट्रिक गुस्टर्ड यांनी हे आरोप केले आहेत.

Advertisement

Advertisement
Loading...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एका निवेदनात म्हटले आहे की, “आयसीसी आचारसंहितेच्या नियम 2.22 नुसार किमान ओव्हर वेगावर खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट स्टाफसाठी, त्यांच्या संघाने टाकलेल्या प्रत्येक ओव्हरसाठी खेळाडूंना सामना शुल्क आकारले जाईल.

Advertisement

Advertisement

ओव्हर रेटशी संबंधित आयसीसीच्या आचारसंहितेनुसार, खेळाडूंना त्यांच्या संघाने निर्धारित वेळेत गोलंदाजी न केल्यास त्यांना प्रति षटकाच्या 20% शुल्क आकारला जातो. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला T20 सामना 68 धावांनी जिंकला होता. तरौबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहितची अर्धशतकी खेळी आणि दिनेश कार्तिकच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने 20 ओव्हर्समध्ये 190 धावा केल्या. यानंतर भारतीय संघाच्या गोलंदाजीसमोर विंडीज संघाला आठ विकेट्सच्या मोबदल्यात 122 धावाच करता आल्या.

Advertisement
Advertisement

Leave a Reply