Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

MSEB Decision : पावसाळ्यातील ‘बत्ती गुल’ चे टेन्शन कमी; महावितरणने घेतलाय ‘हा’ निर्णय..

Please wait..

MSEB Decision : राज्यात सध्या अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार उडाला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर (Flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. वीज तार, खांबांवर झाडे पडून तसेच अतिवृष्टी, पुरामुळे वीज पुरवठा खंडीत (Power Cut) होत आहे. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी फिरते पथक तयार ठेवण्यात आले आहे. आपत्कालीन कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

महावितरणने (MSEB) मान्सूनपूर्व केलेल्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे आणि नियोजनामुळे वीज वितरणात फारशा अडचणी जाणवल्या नाहीत. यासाठी महावितरणचे कर्मचारी आणि राज्यातील पाच हजाराहून अधिक एजन्सीजचे कर्मचारी राबल्यानेच आतापर्यंतचा पाऊस नागरिकांसाठी सुसह्य ठरला आहे. मे आणि जून महिन्यात आवश्यक असलेल्या ठिकाणी व संबंधित परिसरातील वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची वीज बंदची पूवर्सूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर राबविण्यात आली.

Advertisement

Advertisement

पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीज पुरवठा खंडित होण्याचे धोके टाळण्यासाठी महावितरणकडून झाडाच्या फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, ऑईल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, वीज तारा बदलणे अशी महत्वाची कामे करण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार फारसे घडले नाहीत. काही वेळेस वीज गेल्यानंतर पाऊस कमी होताच तत्काळ वीज पुरवठा सुरू करण्यात येत होता. पावसाळ्यात वीज गेल्यास तत्काळ दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीही कमी झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply