Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona : काळजी घ्या..! कोरोना इतक्यात थांबणारा नाहीच; मागील 24 तासांत सापडले ‘इतके’ रुग्ण..

Please wait..

Corona : देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने (Corona Virus Patient) वाढत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 21,566 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, 18 हजार 294 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. देशात सध्या 1 लाख 48 हजार 881 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील दैनिक सकारात्मकता दर (Positivity Rate) 4.25 टक्के आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत 45 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 4 कोटी 31 लाख 50 हजार 434 झाला आहे. त्याच वेळी, आतापर्यंत 5 लाख 25 हजार 870 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

कोरोना विषाणूच्या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. अडीच वर्षांपासून थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या नवीन उप-प्रकाराने अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये काळजी वाढली आहे. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या प्रकाराचा हा उप-प्रकार BA.5 म्हणून ओळखला जात आहे. बर्‍याच तज्ज्ञांनी त्याचे आतापर्यंतचे सर्वात संसर्गजन्य उपप्रकार म्हणून वर्णन केले आहे. त्याचा वेगाने होणारा प्रसार पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) जगातील सर्व देशांना मास्क (Mask) पुन्हा अनिवार्य करण्याची विनंती केली आहे.

Advertisement

Advertisement

जगभरात काही देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. कारण मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाने वेग घेतला आहे. गुरुवारी सकाळी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात तब्बल 21 हजार 566 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा वेग वाढल्याचे स्पष्ट होत आहे. आता तर कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे रुग्णवाढ होताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी काळजी घेणे आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply