Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Jio : रिलायन्स जिओचा आणखी एक जबरदस्त प्लान, फक्त इतक्या रुपयात मिळतोय 2.5 GB डेटा..

Please wait..

Jio : रिलायन्स जिओकडे (Reliance Jio) प्रतिस्पर्ध्यी कंपन्यांच्या तुलनेत फायदेशीर असणारे अनेक प्रीपेड प्लान आहेत. कंपनीकडे 20 दिवसांपासून ते 1 वर्षाच्या वैधतेसह (Validity) प्लान आहेत. तुम्हाला 259 रुपयांमध्ये दररोज 1.5 GB डेटासह एक महिन्याचा प्लान मिळतो. पण आज आम्ही तुम्हाला Jio च्या अशा प्लानबद्दल सांगत आहोत, ज्याची किंमत एका महिन्यासाठी 230 रुपये आहे आणि Disney + Hotstar देखील दररोज 2.5 GB डेटासह उपलब्ध आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

जरी रिलायन्स जिओचे बरेच दीर्घकालीन प्लान आहेत. परंतु आम्ही ज्या प्लानबद्दल माहिती देत आहोत त्याची किंमत 2,999 रुपये आहे. हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच 12 महिन्यांनुसार एका महिन्याचा खर्च 230 रुपये आहे. फीचर्सबद्दल सांगितले तर Jio च्या 2,999 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 2.5 GB डेटा दिला जातो. म्हणजेच एका वर्षात तुम्हाला एकूण 912.5 GB डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉल (Unlimited Voice Call) आणि 100 एसएमएस देखील दररोज दिले जातात.

Advertisement

Advertisement

Jio कडून मोफत Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मिळेल. ज्याची किंमत प्रति वर्ष 499 रुपये आहे. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud देखील मिळेल. एकंदरीत, दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या तुलनेत हा एक चांगला पर्याय असू शकतो. या व्यतिरिक्त जिओचे आणखीही काही प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत. इतर कंपन्यांच्या तुलनेत जिओ नेहमीच काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे देशातील टेलिकॉम क्षेत्रात जिओ कंपनी सध्या आघाडीवर आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply