Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Todays Recipe : घरच्या घरीच तयार करा टेस्टी Coconut Barfi; ही आहे एकदम सोपी Recipe..

Please wait..

Todays Recipe – आपल्याकडे खाद्य पदार्थांचे हजारो प्रकार उपलब्ध आहेत. प्रत्येक राज्यातील खाद्यपदार्थ वेगळे आहेत. काही खास प्रसंगात गोड पदार्थ तर हमखास असतात. मिठाई असते. पेढे, विविध प्रकारची बर्फी हे पदार्थ आपण नेहमीच पाहतो. यामध्ये आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने नारळाची (Coconut) बर्फी कशी तयार करायची याबाबत माहिती देणार आहोत. नारळात लोह, व्हिटॅमिन बी 6 आणि तांबे, मॅग्नेशियम आणि जस्त सारखी खनिजे असतात. चला तर मग जाणून घेऊ या खास कोकोनट बर्फी (Coconut Barfi Recipe) कशी तयार करतात.

Advertisement

साहित्य – 1 कप रवा, अर्धा कप किसलेले खोबरे, 3 चमचे तूप, 1 कप पिठीसाखर, 1 1/2 कप दूध, 2 चमचे सुका मेवा.

Advertisement

Advertisement
Loading...

रेसिपी

Advertisement

सर्वप्रथम कढईत 2 चमचे तूप गरम करा. त्यात रवा टाकून 3-4 मिनिटे परतून घ्या. त्याचा रंग गडद झाला की त्यात किसलेले खोबरे टाका. आणखी 2-3 मिनिटे शिजू द्या. आता ते आचेवरून काढून मिश्रण बाजूला ठेवा. आता दुसऱ्या पॅनमध्ये दूध गरम करून उकळू द्या. आता नारळाचे मिश्रण टाकून चांगले मिक्स करा. साखर टाका आणि पूर्णपणे विरघळू द्या. दूध पूर्णपणे शोषले जाईपर्यंत आणि घट्ट मिश्रण तयार होईपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्या. मिश्रण कढईच्या बाजूने सुटले की ते गॅसवरून काढून घ्या आणि थोडे थंड होऊ द्या. एक चमचा तुपाने ग्रीस करून त्यावर नारळाचे मिश्रण पसरवा. ते समान रीतीने पसरवा आणि ट्रे फ्रीजमध्ये सरकवा. पूर्णपणे गोठल्यावर बर्फीचे तुकडे करा त्यावर ड्राय फ्रुट्स टाकून सजावट करा. अशा पद्धतीने अगदी कमी वेळात तुम्ही घरीच कोकोनट बर्फी तयार करू शकता.

Advertisement

Advertisement

वेगळे काहीतरी : घरीच तयार करा साऊथ इंडियन स्टाइल कांदा उत्तपा; ही आहे सोपी रेसिपी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply