Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारसाठी Good News.. पैसेही वाढले, सोनेही वाढले; पहा, नेमके घडले तरी काय..

Please wait..

मुंबई – 24 जून रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा (Forex Reserve) $2.734 अब्ज डॉलरने वाढून $593.323 अब्ज झाला आहे. रिजर्व्ह बँकेच्या (Reserve Bank Of India) गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार, परकीय चलन साठा $5.87 अब्ज डॉलरने कमी होऊन $590.588 अब्ज झाला होता. तथापि, नवीन वाढीचे कारण म्हणजे परकीय चलन संपत्तीत झालेली वाढ.

Advertisement

24 जून रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात वाढ (Increase In Foreign Reserve) होण्याचे कारण म्हणजे परकीय चलन मालमत्तेत वाढ, जी एकूण चलन साठ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. याशिवाय सोन्याच्या साठ्यात वाढ (Gold Reserve) झाल्याने परकीय चलनाचा साठाही वाढला आहे. आकडेवारीनुसार, परकीय चलन मालमत्ता (FCA) $ 2.334 अब्जने वाढून $ 529.216 अब्ज पर्यंत पोहोचली आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

परकीय चलन साठ्यामध्ये ठेवलेल्या विदेशी चलन मालमत्ता, डॉलरमध्ये व्यक्त केल्या जातात, त्यात युरो, पौंड आणि येन यांसारख्या गैर-अमेरिकन चलनांमधील मूल्यवृद्धी किंवा घसारा यांचा समावेश होतो. आकडेवारीनुसार, सोन्याच्या साठ्याचे मूल्यही या आठवड्यात $342 दशलक्षने वाढून $40.926 अब्ज झाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सह विशेष रेखांकन अधिकार (SDRs) $55 दशलक्षने वाढून $1821 अब्ज झाले. IMF कडे ठेवलेला देशाचा चलन साठाही 30 लाख डॉलरने वाढून $4.97 अब्ज झाला आहे.

Advertisement

Advertisement

विशेष म्हणजे, डॉलरच्या तुलनेत रुपया कमी होत होता. तरी देखील देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ झाली आहे. यावेळी तर सोन्याच्या साठ्यातही वाढ झाली आहे. सरकारसाठी ही आनंदाची बातमी आहे. देशात बेरोजगारी, महागाई वाढत असून नागरिक हैराण होत आहेत. मात्र,  त्यामुळे सरकारच्या कर संकलनात फारसा फरक पडलेला नाही. सरकारचा महसूल आणि कर संकलनात सातत्याने वाढ होत आहे.

Advertisement

नव्या वर्षात खुशखबर..! घटत चाललेला परकीय चलन साठा वाढला; फक्त सात दिवसात ‘इतक्या’ डॉलरची पडली भर

Advertisement
Advertisement

Leave a Reply