Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आषाढी वारीसाठी महामंडळ सज्ज..! ‘या’ जिल्ह्यातून पंढरीला जाणार ‘इतक्या’ बस; जाणून घ्या..

अहमदनगर – आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport) नगर विभागाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. यावेळी जिल्ह्यातील आगारांतून पंढरपूरसाठी (Pandharpur) 300 जादा बस सोडण्यात येणार आहेत. जादा वाहतूक 5 जुलैपासून सुरू होणार आहे. या वाहतुकीचे नियोजनासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची सध्या धावपळ सुरू आहे. 13 जुलैपर्यंत ही जादा वाहतूक सुरू राहणार आहे.

Advertisement

आषाढी एकादशीनिमित्त १० जुलै रोजी पंढरपूर यात्रा आहे. राज्यभरातून येथे लाखोंच्या संख्येने वारकरी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी महामंडळाकडून जादा वाहतुकीची व्यवस्था करण्यात येते. यंदा कोरोनाचे (Corona Virus) कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. महामंडळानेही जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार नगर विभागाच्या वतीने पंढरपूर वारीसाठी ३०० विशेष बस सोडल्या जाणार आहेत. ५ जुलै ते १३ जुलै या कालावधीत जादा वाहतूक सुरू राहणार आहे.

Advertisement

पंढरपूर यात्रेमुळे महामंडळाला कोट्यवधीचे आर्थिक उत्पन्न मिळते. गेल्या दोन वर्षांत पंढरपूरची यात्रा भरली नाही. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधीचे उत्पन्न बुडाले आहे. नगर विभागाला या यात्रेतून जवळपास एक कोटींचे उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या दोन वर्षांत नगर विभागाला दोन कोटींचा आर्थिक फटका बसला आहे. कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाल्याने राज्य शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध उठविले आहेत. जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे यंदा १० जुलै रोजी पंढरपूर यात्रा होत आहे.

Loading...
Advertisement

नगर विभागाने सध्या तरी ३०० बसचे नियोजन केले आहे. तयारीसाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे. नगर शहरातील तारकपूर बसस्टँड येथून पंढरपूरसाठी बस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय 8 जुलैपासून देखील काही जादा बस पंढरपूर यात्रेसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.

Advertisement

दरम्यान, ज्या गावातून एकाच वेळी ४४ जण पंढरपूरला जाण्यासाठी तयार असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र बस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आगारप्रमुखांशी संपर्क साधावा. बस बूक केल्यास थेट गावातूनच जाण्या येण्याची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती नगर विभागीय कार्यालयातून देण्यात आली.

Advertisement

एसटी संपाबाबत महत्वाची अपडेट, हायकोर्टात आज होणार मोठा फैसला..!

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply