रशियावरील निर्बंधांचा फटका जगालाही.. ‘त्यामुळे’ कमी होऊ शकतात रशियावरील निर्बंध; जाणून घ्या..
दिल्ली : संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी संकेत दिले आहेत की जगातील अन्न संकट आणि इंधनाचे संकट (Fuel Crisis) पाहता रशिया आणि बेलारूसवरील निर्बंध शिथिल केले जातील. पण त्याआधी युक्रेनमध्ये युद्धविराम व्हायला हवा. हे उल्लेखनीय आहे, की रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू (Wheat) उत्पादक देश आहे तर रशिया हा अमेरिका आणि सौदी अरेबियानंतर जगातील तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. आफ्रिकन, आशियाई आणि अनेक लॅटिन अमेरिकन देशांना रशियामध्ये पिकवलेल्या गव्हाचा फायदा होतो. त्याचप्रमाणे, बहुतेक युरोपियन देश मुख्यत्वे रशियन नैसर्गिक वायूवर (Natural Gas) अवलंबून आहेत.
खनिज खतांसह अनेक खनिजे आणि रसायनांच्या उत्पादनातही रशियाचा क्रमांक वरचा आहे. त्यामुळे रशियावरील निर्बंध जगासमोर अडचणी निर्माण करत आहेत. युक्रेनमधील युद्धामुळे तेथे गव्हाचे उत्पादन होत नाही. रशियन सैन्याने बंदरे आणि इतर ठिकाणी ठेवलेला लाखो टन गहू ताब्यात घेतला आहे. ट्रकद्वारे बराच गहू रशियाला पाठवला गेला आहे. त्यामुळे जगात अन्न संकटाचा (Food Crisis) धोका निर्माण झाला आहे.
युक्रेनमधील युद्ध निरर्थक, निर्दयी आणि अंतहीन असल्याचे सांगत गुटेरेस यांनी जगातील देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाचे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या प्रभावापासून कोणताही देश बाजूला राहू शकत नाही. रशियावरील निर्बंधांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान होत असल्याचे चीनने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2022 मध्ये जागतिक आर्थिक वाढ (Economic Growth) 3.6 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, युक्रेन विरोधात सुरू असलेल्या युद्धा दरम्यान (Russia Ukraine War) रशियानेही आपले इरादे जगाला सांगितले आहेत. रशियन सैन्याच्या जनरलने स्पष्टपणे सांगितले आहे, की दक्षिण युक्रेनवर कब्जा करणे हे त्यांचे लक्ष्य आहे. रशियन सैन्याच्या जनरलच्या या विधानाने रशियाला युक्रेनचा भूभाग ताब्यात घ्यायचा नाही असे आधीचे सर्व वक्तव्ये खोटे होते, हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रशियन सैन्याने खार्किव प्रदेशातील एक मोठा शस्त्रसाठा ताब्यात घेतल्याचेही वृत्त मिळाले आहे. येथे हजारो टन दारूगोळा आणि शस्त्रे आहेत.
त्याचवेळी हे युद्ध थांबवण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्राचे (United Nations) महासचिव अँटोनिया गुटेरेस मॉस्कोला भेट देणार आहेत. रशियन सैन्याच्या वतीने असे सांगण्यात आले आहे, की त्यांनी डॉनबाससह जवळजवळ संपूर्ण दक्षिण युक्रेन ताब्यात घेतला आहे आणि आता ते दक्षिणेकडे मोल्दोव्हाच्या दिशेने जात आहेत. रशियाच्या म्हणण्यानुसार, लष्कराने युद्धाच्या दुसऱ्या टप्प्याचे लक्ष्य गाठले आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढला अंधार..! पहा, ‘या’ मंत्र्याने नेमके काय दिलेय वीज टंचाईचे कारण..
रशियाचा अमेरिकेवर मोठा आरोप..! म्हणाला.. युक्रेनला मदत देत करतोय ‘हे’ काम; जाणून घ्या..