Take a fresh look at your lifestyle.

चीनमध्ये अजूनही कोरोनाचे थैमान..! तब्बल ‘इतक्या’ शहरात केलेय कठोर लॉकडाऊन; जाणून घ्या Corona Update

दिल्ली – चीनमध्ये स्थानिक पातळीवर कोरोना संसर्गाची 20 हजारांहून अधिक प्रकरणे सोमवारी नोंदली गेली. यामध्ये 3,297 लक्षणे असलेल्या आणि 17,332 लक्षणे नसलेल्या प्रकरणांचा समावेश आहे. संसर्गाची प्रकरणे वाढल्याने चीनमध्ये (China) राष्ट्रीय संकटासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. चीनच्या आर्थिक शहर शांघायसह अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊनमुळे (Lockdown) सर्वसामान्यांच्या समस्या प्रचंड वाढल्या आहेत. प्रशासकीय कठोरपणामुळेही लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. शांघायमध्ये कोरोना संसर्गामुळे सोमवारी सात जणांना आपला जीव गमवावा लागला. शांघाय व्यतिरिक्त, इतर 18 प्रांतीय पातळीवर कोरोनाची प्रकरणे (Corona Patient) वाढत आहेत.

Advertisement

ही सर्व प्रकरणे स्थानिक संसर्गाची आहेत ही चीनसाठी काळजीची गोष्ट आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी चीनने कडक लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे दैनंदिन पुरवठाही (Supply Chain) विस्कळीत होत आहे. दैनंदिन वस्तू लोकांपर्यंत पोहोचण्यात अधिकाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. गुंतवणूक बँक नोमुरा आणि CNN च्या अहवालानुसार, गुरुवारपर्यंत चीनमधील किमान 44 शहरे पूर्ण किंवा आंशिक लॉकडाऊन अंतर्गत होती. शांघायमध्ये सर्वात कडक लॉकडाउन आहे. त्यामुळे शांघायच्या सुमारे अडीच कोटी लोकसंख्येला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Advertisement

लोकांना त्यांच्या घरात किंवा खास डिझाइन केलेल्या छोट्या खोल्यांमध्ये ठेवले जाते. त्यांना थोडा वेळही बाहेर पडू दिले जात नाही. त्यामुळे लोकांमध्येही सरकारबद्दलचा रोष वाढत आहे. सरकारसाठी वाढत्या संसर्गाचे आव्हान आहे यामध्ये जेव्हा संसर्गाचे एक प्रकरण देखील नोंदले जाते तेव्हा अतिशय कठोर निर्बंधांची तरतूद आहे.

Advertisement

अमेरिका आणि चीन कोरोनाने हैराण..! चीनमध्ये आणखी एका शहरात कठोर लॉकडाऊन; जाणून घ्या अपडेट

Advertisement

चीनमध्ये सुरू आहे कोरोनाचे थैमान; भारताने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; जाणून घ्या कोरोना अपडेट

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply