Take a fresh look at your lifestyle.

रशियाच्या मदतीसाठी भारतही करतोय जोरदार हालचाली; पहा, काय सुरू आहे व्यापार विश्वात..?

दिल्ली : युक्रेन विरोधातील युद्धानंतर रशियावर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांच्या परिस्थितीत भारतीय चलन रुपया आणि रशियन चलन रुबलमध्ये व्यवहारांची व्यवस्था लवकरच होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमधील नव्या व्यवस्थेबाबतची बहुतांश कार्यवाही पूर्ण झाली असून लवकरच त्याची घोषणा होऊ शकते.

Advertisement

या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकार दोन्ही देशांमधील युद्धावर बारीक लक्ष ठेऊन आहे. काही निर्णायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसताच सरकार त्याची घोषणा करू शकते. या पेमेंट सिस्टमसाठी भारतीय रिजर्व्ह बँक आणि रशियन स्टेट डेव्हलपमेंट बँक यांच्यात करार करण्यात येणार आहे.

Advertisement

हे प्लॅटफॉर्म SWIFT च्या धर्तीवर असू शकते आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून, त्यात इतर अनेक देशांचा समावेश असू शकतो, जे डॉलरऐवजी त्यांच्या चलनामध्ये व्यापार करू इच्छितात. दरम्यान, रशियन आयातदारांनी त्यांच्या मालाची यादी भारतीय व्यापाऱ्यांना पाठवण्यास सुरुवात केली आहे जेणेकरून नवीन पेमेंट प्रणाली लागू झाल्यानंतर मालाचा पुरवठा अधिक जलद होऊ शकेल.

Advertisement

खाद्यपदार्थांसह दैनंदिन वस्तूंची एक मोठी यादी रशियाने भारतीय व्यावसायिकांना पाठवली आहे. यामध्ये चहा, कॉफीसह बहुतांश प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या पुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे. त्याच वेळी, रेडिमेड कपड्यांव्यतिरिक्त अन्य गोष्टींची यादी देखील भारतीय निर्यातदारांना पाठवण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील युद्धानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर बंदी घातली होती, त्यानंतर ते SWIFT पेमेंट सिस्टमच्या बाहेर पडले आहे. त्यातून बाहेर पडल्यामुळे रशियाला इतर देशांकडून आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे देण्याची अडचण येत आहे. भारत आणि रशियामध्ये पेमेंट सिस्टीम तयार होताच येथून मालाचा पुरवठा सुलभ होईल, असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

आधी चीन.. आता रशिया..! युरोपातील ‘या’ लहान देशाने केलाय मोठाच कारनामा; पहा, रशियाला कसा दिलाय धक्का..

Advertisement
Advertisement

Leave a Reply