Take a fresh look at your lifestyle.

महागाई रोखण्यासाठी काँग्रेसचा प्लान..! देशभरात सुरू करणार ‘हे’ मोठे अभियान; पहा, मोदी सरकारला ‘कसे’ घेरणार..

मुंबई : देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीच्या मुद्द्यावरून काँग्रेस 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान ‘महागाई मुक्त भारत अभियान’ सुरू करणार आहे. या मोहिमेची सुरुवात तीन टप्प्यात धरणे आंदोलनाने होणार आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ही माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुरजेवाला यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारने सध्या फक्त आपली तिजोरी भरण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतींविरोधातील आंदोलनात काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी होणार असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. सुरजेवाला म्हणाले की, इंधनाच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पण सरकारला त्याची पर्वा नाही. 5 दिवसांत आज चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यावरून भाजप सरकारवर टीका करताना सुरजेवाला म्हणाले की, भाजपला जनतेची पर्वा नाही. याआधी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सुद्धा या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली होती. ट्विटद्वारे त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली होती.

Advertisement

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याचा भार तेल कंपन्या लोकांवर टाकत असून, त्यामुळे गेल्या 5 दिवसांत चौथ्यांदा दरात वाढ करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2021 नंतर पहिल्यांदाच 22 मार्च रोजी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आणि तेव्हापासून सातत्याने दर वाढत आहेत.

Advertisement

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर आता 97.81 रुपये प्रति लिटरवरून 98.61 रुपये आणि डिझेलचा दर 89.07 रुपयांवरून 89.87 रुपये प्रति लिटर झाला आहे. साडेचार महिने दर स्थिर राहिल्यानंतर 22 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून इंधनाच्या दरात प्रतिलिटर 80-80 पैशांनी तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. या एकूण चार वेळा वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर एकूण 3.20 ने वाढ झाली आहे.

Advertisement

आजही बसलाय पेट्रोल-डिझेल महागाईचा झटका; पहा, किती रुपयांनी वाढलेत इंधनाचे भाव..

Advertisement

वाव.. तब्बल 15 कोटी लोकांना मिळालेय ‘इलेक्शन गिफ्ट’..! सरकारने घेतलाय ‘हा’ खास निर्णय; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply