Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री भगवंत मान यांचा आणखी एक निर्णय; तब्बल 35 हजार कर्मचाऱ्यांचा होणार फायदा; जाणून घ्या..

दिल्ली : पंजाबमध्ये आम आदमीचे सरकार आल्यानंतर या सरकारने पहिल्याच दिवसापासून कामकाजास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री भगवंत यांनी तर जनहिताचे निर्णय घेत राज्यातील नागरिकांना दिलासा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत राज्यात एका महिन्यात सरकारी विभागातील 25 हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आजही असाच एक निर्णय घेतला असून ज्याचा फायदा राज्यातील 35 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार आहे.

Advertisement

पंजाब सरकार 35,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित केले जाणार असल्याचे सांगितले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी सांगितले की, राज्य सरकार 35,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणार आहे. मान यांनी एका संदेशात म्हटले आहे की, “गट क आणि ड च्या 35,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिल्याचे भगवंत मान यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की त्यांच्या पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीआधी आश्वासन दिले होते की ते सत्तेवर आल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करू. त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत राज्यातील लोकांना दिलासा देणारा निर्णय घेतला होता. पहिल्या कॅबिनेट बैठकीत महिनाभरात 25 हजार सरकारी नोकऱ्यांची मोठी घोषणा केली. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत 25 हजार पदे तातडीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये 10 हजार पदे पोलीस विभागातील तर 15 हजार पदे अन्य शासकीय विभागातील असतील. या भरतीमध्ये मंडळ आणि महामंडळ विभागाची पदेही भरली जाणार आहेत. राज्याचे नवे सरकार आपला पहिला अर्थसंकल्प जून महिन्यात सादर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

शनिवारी सकाळी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात दहा आमदारांचा समावेश करण्यात आला. पंजाब भवन येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या 10 मंत्र्यांपैकी आठ पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. आम आदमी पक्षाने (आप) 117 सदस्यांच्या पंजाब विधानसभेत 92 जागा जिंकत बहुमत मिळवले. या निवडणुकीत काँग्रेसचे मात्र मोठे नुकसान झाले. पंजाबसारखे मोठे राज्य काँग्रेसला गमवावे लागले. तसेच अन्य चार राज्यांच्या निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे.

Advertisement

पहिलाच निर्णय रोजगाराचा..! ‘या’ राज्यात महिनाभरात 25 हजार पदे भरणार.. पहा, कुणी केलीय घोषणा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply